शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोना : ट्रम्प यांचा ढिसाळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 2:43 AM

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा आरोप

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनाची स्थिती ट्रम्प यांनी ढिसाळपणे हाताळली, असा आरोप राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोना साथीला रोखण्यासाठी आम्ही जी कामगिरी करून दाखविली ती बिडेन यांना कधीही जमली नसती. ती धडाडी रक्तात असावी लागते. प्रसंग होता मंगळवारी रात्री या दोन उमेदवारांमध्ये झालेल्या जाहीर चर्चेचा.

तुम्ही जरा गप्प बसणार का? (विल यू शट अप, मॅन?) या शब्दांत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारले. या चर्चेच्या पहिल्या फेरीत रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. पहिल्या फेरीतील चर्चा कोरोनाची साथ, शहरात सुरू असलेला हिंसाचार, वाढती बेकारी, तसेच देशाच्या आरोग्य योजनेचे सर्वोच्च न्यायालय ठरविणार असलेले भवितव्य या मुद्यांभोवती केंद्रित झाली होती.ज्यो बिडेन बोलत असताना, त्यांना थांबविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प अक्षरश: अंगावर ओरडत होते, तर जो बिडेन हेदेखील काहीशा आक्रमकपणे ट्रम्प यांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न करीत होते.क्लीव्हलँड येथे दोन उमेदवारांमध्ये जाहीर चर्चेची पहिली फेरी झाली. यावेळी ज्यो बिडेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प करीत असलेला प्रत्येक दावा खोटा आहे. ते सर्वांनाच माहीत आहे. अमेरिकेतील मतदारांमध्ये तरंगत्या मतदारांचा वर्ग असतो की, जो कोणाला मत द्यावे हे आयत्या वेळेस ठरवितो. अशा मतदारांवर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला विजय मिळणार, हे कधी-कधी अवलंबून असते. त्यामुळे या मतदारांना आकृष्ट करण्याचा बिडेन व ट्रम्प यांनी प्रयत्न चालविला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प