चीनमध्ये पुन्हा वाढू लागला काेराेनाचा संसर्ग; एकाच प्रांतात आढळले ४६ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 07:36 AM2021-09-13T07:36:59+5:302021-09-13T07:38:10+5:30

चीनमध्ये पुन्हा काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत आहे.

corona re emerges in China 46 new patients found in the same province pdc | चीनमध्ये पुन्हा वाढू लागला काेराेनाचा संसर्ग; एकाच प्रांतात आढळले ४६ नवे रुग्ण

चीनमध्ये पुन्हा वाढू लागला काेराेनाचा संसर्ग; एकाच प्रांतात आढळले ४६ नवे रुग्ण

Next

बीजिंग :चीनमध्ये पुन्हा काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. चीनमध्ये ४६ नवे रुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक २० रुग्ण दक्षिणेकडील फुजियान प्रांतामध्ये आढळले आहेत. हे सर्व रुग्ण परदेशातून चीनमध्ये दाखल झाले आहेत, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आराेग्य आयाेगाने दिली. संसर्ग राेखण्यासाठी या भागात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

आयाेगाने दिलेल्या माहितीनुसार, फुजियान प्रांतातील पुतियानमध्ये काेराेनाचे २० नवे रुग्ण आढळले. तर एक रुग्ण जवळच्याच कुआनझाेउ भागात आढळला. सर्व नवे रुग्ण परदेशातून आलेले आहेत. त्यांच्यात काेराेनाचा डेल्टा विषाणू आढळला आहे. या भागात संसर्ग राेखण्याचा आटाेकाट प्रयत्न अधिकारी करीत आहेत. तज्ज्ञांचे एक पथक पुतियान येथे पाठवित असल्याचे आयाेगाने सांगितले.

सुविधा झाल्या बंद

- पुतियान भागात बस, रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच चित्रपटगृह, बार व इतर सार्वजनिक सुविधादेखील तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. 

- चीनमध्ये आतापर्यंत ९ लाख ५१ हजार नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला असून ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
 

Web Title: corona re emerges in China 46 new patients found in the same province pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.