कोलंबिया लष्करी विमान अपघात; ६६ जवानांचा मृत्यू, २१ जण अजूनही बेपत्ता! भीषण अपघाताचा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:42 IST2026-03-24T09:41:43+5:302026-03-24T09:42:05+5:30
संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील एकूण १२५ प्रवाशांपैकी ६६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कोलंबिया लष्करी विमान अपघात; ६६ जवानांचा मृत्यू, २१ जण अजूनही बेपत्ता! भीषण अपघाताचा Video
सोमवारी दक्षिणी अमेझॉनच्या घनदाट जंगल परिसरात कोलंबिया लष्कराचे एक मालवाहू विमान कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली असून, २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
समोर आलेल्या माहितीनुसार, 'लॉकहीड मार्टिन' निर्मित 'हर्क्युलिस C-130' हे लष्करी विमान पेरूच्या सीमेजवळील प्वेर्तो लेगुइझामो येथून उड्डाण करत होते. उड्डाण घेतानाच धावपट्टीच्या शेवटी विमानाची कशाशी तरी धडक झाली. त्यानंतर विमानाचा एक पंख झाडाला धडकला आणि क्षणात विमानाने पेट घेतला. विमानात मोठ्या प्रमाणावर स्फोटके असल्याने दुर्घटनास्थळी भीषण स्फोट झाले आणि विमानाचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले.
रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे
संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील एकूण १२५ प्रवाशांपैकी ६६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुटुमायो विभागाचे गव्हर्नर जॉन गॅब्रिएल मोलिना यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त भाग अत्यंत दुर्गम असल्याने बचाव पथकांना तेथे पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. तरीही स्थानिक नागरिक आणि लष्कराने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.
🚨 Horrific crash caught on camera:
— Derrick Evans (@DerrickEvans4WV) March 23, 2026
Colombian military plane loses altitude seconds after takeoff before slamming into Puerto Leguízamo, leaving 90 dead and dozens injured.pic.twitter.com/vJK3iRdjpo
स्थानिकांचे धाडस आणि व्हायरल व्हिडिओ
या भीषण दुर्घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये विमानाचा ढिगारा आणि धुराचे लोट दिसत आहेत. विशेष म्हणजे, प्रशासकीय मदत पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. कच्चे रस्ते आणि दुर्गम भाग असतानाही स्थानिकांनी स्वतःच्या दुचाकींवरून जखमी जवानांना रुग्णालयापर्यंत पोहोचवल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
At least 34 people were killed and 81 were treated for injuries, after a #Colombian Air Force plane crashed shortly after takeoff in the southern Amazon region on Monday. A Lockheed Martin Hercules C-130 transport plane crashed about 1.5 km from the runway at Puerto Leguízamo, pic.twitter.com/xLjed28qgX
— Shakeel Yasar Ullah (@yasarullah) March 24, 2026
लष्कराच्या इतिहासातील काळा दिवस
कोलंबियन हवाई दलाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात मानला जात आहे. विमानात असलेल्या स्फोटकांमुळे लागलेली आग इतकी भीषण होती की मृतांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. अजूनही २१ जण बेपत्ता असून ढिगाऱ्याखाली त्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.