अर्थव्यवस्था कोसळल्याने व्हेनेझुएलातून लाखोंचे स्थलांतर, चलनवाढीचा दर १0 लाख टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:06 AM2018-08-28T08:06:14+5:302018-08-28T09:34:25+5:30

कचऱ्यात शोधत आहेत लोक अन्न; वर्षभरात लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले, कच्च्या तेलाच्या दरामुळे कोसळला डोंगर

Since the collapse of the economy, the migration of millions from Venezuela, the inflation rate to 10 lakhs per cent | अर्थव्यवस्था कोसळल्याने व्हेनेझुएलातून लाखोंचे स्थलांतर, चलनवाढीचा दर १0 लाख टक्क्यांवर

अर्थव्यवस्था कोसळल्याने व्हेनेझुएलातून लाखोंचे स्थलांतर, चलनवाढीचा दर १0 लाख टक्क्यांवर

googlenewsNext

कॅराकस : तेलाचे प्रचंड साठे असणारा व्हेनेझुएला देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. देशातील लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नाहीत. बेसुमार चलनवाढीमुळे ब्रेड, अंडे विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहे. गेल्या वर्षभरात या देशातील लोकांचे सरासरी ११ किलो वजन कमी झाले आहे. देशातील लोक कचºयामध्ये अन्न शोधून खाताना दिसतात. जिवंत राहण्यासाठी व्हेनेझुएलाच्या लाखो लोकांनी स्थलांतर केले आहे. सुमारे १0 लाख लोक कोलंबियामध्ये राहत आहेत.

बेसुमार चलनवाढ हा व्हेनेझुएलाचा प्रश्न आहे. चलवाढीचा दर १0 लाख टक्क्यांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाचे दर कोसळल्यामुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहेच. ह्युगो चावेज १९९९ साली व्हेनेझुएलाच्या सत्तेवर आले. त्यांनी कच्च्या तेलातून मिळालेल्या पैशांतून गरिबांना मदत केली, अन्न, औषधांवर सबसिडी दिली, शिष्यवृत्त्या दिल्या, जमीन सुधारणा कायदे केले. तेलाच्या पैशातून सर्व वस्तुंची आयात सुरू केली. पुढे २0१३ मध्ये चावेज यांचे कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर लगेचच तेलाचे भाव कोसळले. तेलाचे भाव घसरल्याने पैसा कमी मिळू लागला. आयात करण्याची क्षमता कमी झाली. (वृत्तसंस्था)

चलनाला अर्थच नाही राहिला
व्हेनेझुएलाने नवे चलन बाजारात आणायचे निश्चित केले. सध्या कोसळलेल्या बोलिवर चलनामधील शेवटचे तीन शून्य काढून टाकण्याचा निर्णय निकोलस मडुरो यांनी घेतला होता. आता पाच शून्ये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे केल्यामुळे चलनवाढीशी लढा थोडा सोपा होईल, असे मडुरो यांना वाटते.

गुन्हेगारी वाढली : व्हेनेझुएलामध्ये गरिबी आणि बेरोजगारीमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात २७ हजार लोकांच्या हत्या झाल्या. श्रीमंतांवरच प्रामुख्याने हल्ले होत आहेत, हत्याही त्यांच्याच होत आहेत. त्यामुळे श्रीमंतांना अधिक काळजी घ्यावी लागत आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा केवळ ५0% आयातच त्या देशाला करता आली, पण रुपयाची घसरण मात्र प्रचंड होत गेली. व्हेनेझुलातील मासिक वेतन आज केवळ १ डॉलर इतके घसरले आहे. त्यामुळे साध्या गरजा भागवणेही अशक्य झाले आहे.

Web Title: Since the collapse of the economy, the migration of millions from Venezuela, the inflation rate to 10 lakhs per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.