चिनी सुधरणार नाहीत; कोरोनानंतरही 'हे' काय खाताहेत बघा, फेस्टिव्हलच सुरू आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 14:28 IST2020-06-23T14:14:39+5:302020-06-23T14:28:36+5:30
अवघ्या जगाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. पण निर्लज्ज असलेल्या चीनमध्ये मोठमोठे महोत्सव साजरे करणे पुन्हा सुरु झाले आहे.

चिनी सुधरणार नाहीत; कोरोनानंतरही 'हे' काय खाताहेत बघा, फेस्टिव्हलच सुरू आहे!
चीनचे शहर वुहानमधून जन्मलेल्या कोरोना व्हायरसने अवघ्या जगाच्या नाकीनऊ आणले आहेत. लाखो बळी घेत अब्जावधींच्या संख्येने नागरिकांच्या भविष्याचा प्रश्न उभा केला आहे. अवघ्या जगाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागली आहे. पण निर्लज्ज असलेल्या चीनमध्ये मोठमोठे महोत्सव साजरे करणे पुन्हा सुरु झाले आहे.
चीनच्या युलिन शहरातील गुवांग्शी प्रांतामध्ये ‘डॉग मीट फेस्टिवल’ पुन्हा सुरु झाला आहे. कोरोना व्हायरसचा उगम वटवाघुळांपासून झाल्याचे सांगितले जाते. तर वुहानमधील लॅबमध्ये हा व्हायरस तयार केल्याचेही बोलले जाते. एकंदरीत चीनच या व्हायरसचा जन्मदाता असताना आता कोरोना व्हायरसमुळे हा फेस्टिव्हल थांबणार नाही असेही सांगितले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनवरील पॉलिसी स्पेशालिस्ट पीटर ली यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. ते ह्युमन सोसायटी ऑउ इंटरनॅशनलमध्येही कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटमध्येम्हटले आहे की, ''युलिन यंदा तरी बदलेल अशी मी आशा व्यक्त करतो. केवळ प्राण्यांसाठी नाही तर आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीतही. एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे लोकांसाठी धोक्याचे आहे. काही संस्थांनी या फेस्टिव्हलमधून कुत्रे आणि त्यांच्या पिल्लांना वाचविले आहे.''
Some puppies were rescued from the Yulin dog meat festival in Guangxi Province, China on June 17, as the annual 10-day festival opened in defiance of a government campaign to ban wildlife trade in China. | Humane Society International/Handout via @Reuterspic.twitter.com/wtrlY8uOE2
— ABS-CBN News (@ABSCBNNews) June 23, 2020
चीन नवा कायदा आणणार
न्यूयॉर्क पोस्टनुसार चीन सरकार जंगली प्राण्यांशी संबंधित व्यवहार आणि पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यापारासाठी नवीन कायदा आणण्यावर काम करत आहे. कोरोना व्हायरस माणसाच्या आधी वटवाघळांमध्ये सापडत होता, असे म्हटले जाते. कोरोनाचा जगातील पहिला रुग्ण वुहानच्या त्याच बाजारात सापडला होता, जिथे वटवाघळांचे मांस विकले जाते. चीनने यानंतर फेब्रुवारीमध्ये वटवाघळे आणि सापांच्या विक्रीवर बंदी लादली होती. सध्यातरी शेन्झेंग हे एकमेव शहर आहे जिथे डॉग मीटवर बंदी आणण्यात आली आहे.
भविष्यात बंदी शक्य
चीनमधील एक सामाजिक कार्यकर्ते Zhang Qianqian यांनी सांगितले की, भविष्यात या फेस्टव्हलवर बंदी येऊ शकते. कदाचित हा शेवटचा फेस्टिव्हल असू शकतो. मीट विकणाऱ्या अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. काही नेत्यांचेही म्हणणे हेच आहे की बंदी येऊ शकते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
थरारक! सीएने पत्नीची हत्या केली; विमानाने सासुरवाडीला जात सासूला गोळ्या घातल्या
चिंगारी भडकली! चीनच्या TikTok ला टक्कर देणार भारतीय अॅप
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला
Maruti Suzuki ची नवीन सीएनजी कार लाँच; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा
'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...