India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 21:14 IST2020-09-01T20:54:29+5:302020-09-01T21:14:23+5:30

India China FaceOff: भारतीय जवानांवर चीनने जूनच्या मध्यावर भ्याड हल्ला केला होता. अंधाऱ्या रात्रीचाच फायदा उचलला होता. भारतीय जवान चीनचे सैनिक माघारी गेले की नाहीत हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या चीनच्य़ा सैनिकांनी भारतीय जवानांवर काटेरी रॉडनी हल्ला केला होता.

China's re-infiltration attempt last night; brave soldiers beat him again | India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला

India China FaceOff: तोंडावर पडला तरी! चीनचा पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न; शूर जवानांनी हाणून पाडला

29-30 ऑगस्टच्या मध्यरात्री चीनच्या सैनिकांनी मोठ्या फौजफाट्यासह लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भारतीय जवानांनी हाकलले होते. तीन महिन्यात दुसऱ्यांदा तोंडावर आपटूनही पुन्हा सोमवारी रात्री चीनच्या सैनिकांनी लडाखमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. 


रात्रीच्या अंधाराचा फायदा उठविण्यासाठी चीनच्या सैनिकांनी वेषांतर केले होते. काळा पोषाख आणी काळे हॅल्मेट घालून भारतीय हद्दीत घुसत होते. मात्र, नेहमीच सतर्क असणाऱ्या भारतीय जवानांच्या तीक्ष्ण नजरेने अंधाऱ्या रात्रीही चीनच्या सैनिकांना हेरले आणि पुन्हा मागे पिटाळले. चेपुझी कॅम्पवरून चीनच्या 7 ते 8 मोठ्या गाड्या भारतीय सीमेच्या दिशेने येत होत्या. भारतीय जवानांनी घेरल्याचे पाहून त्यांनी माघारी वळणे पसंत केले. या हालचालींवरून भारतीय सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

 




भारतीय जवानांवर चीनने जूनच्या मध्यावर भ्याड हल्ला केला होता. अंधाऱ्या रात्रीचाच फायदा उचलला होता. भारतीय जवान चीनचे सैनिक माघारी गेले की नाहीत हे पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या चीनच्य़ा सैनिकांनी भारतीय जवानांवर काटेरी रॉडनी हल्ला केला होता. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर भारतीय जवानांनी त्याही परिस्थितीत सावरत प्रतिहल्ला केला होता. डोंगरातील पाण्याचा जोर आणि त्यात चीनचा हल्ला परतवून लावत जवानांनी चीनचे सैनिकही मारले होते. 


तेव्हापासून एलएसीवर तणाव असून गेल्या दोन दिवसांपासून चीन घुसखोरी करू लागला आहे. गेल्या महिन्यात चीनच्या सैन्याने पेंगाँग झीलच्या बाजुची जागा ताब्यात घेतली होती. तर रविवारी रात्रीच्या सुमारास चीनने 500 जवानांना घेऊन घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तो भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. आता पुन्हा दुसऱ्या रात्री अंधाराचा फायदा घेण्याचा प्रयत्न चीनने केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

India China FaceOff: चीन चवताळला! पुढच्या वेळी अमेरिकाही मदतीला येणार नाही; भारताला धमकी

Post Office: पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार उमेदवारांची निवड

Unlock4: खूशखबर! उद्यापासून करू शकणार राज्यांतर्गत रेल्वे प्रवास; बुकिंग सुरू करण्यास परवानगी

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार 

BSNL ची धांसू ऑफर; प्रीपेड रिचार्जवर 600 रुपयांपर्यतचा अतिरिक्त टॉकटाईम

Web Title: China's re-infiltration attempt last night; brave soldiers beat him again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.