शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

चीनच्या गुप्तहेर चिमण्यांनी वाढवली भारताची चिंता  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 3:05 PM

गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विज्ञान आणि आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच प्रगतीच्या जोरावर चीनने असे काही आविष्कार केले आहेत ज्यामुळे भारतासह चीनच्या शेजारील देशांची चिंता वाढणार आहे.

शिनजियांग - गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विज्ञान आणि आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच प्रगतीच्या जोरावर चीनने असे काही आविष्कार केले आहेत ज्यामुळे भारतासह चीनच्या शेजारील देशांची चिंता वाढणार आहे. आता चीनने पक्ष्यांच्या आकाराचे ड्रोण विकसित केले आहेत. चीनने हे ड्रोण सीमेवर तैनात करण्याच सुरुवात केली असून, चीनच्या या अत्याधुनिक गुप्तहेरांमुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.  साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने शिनजियांग प्रांतात या तंत्राचा वापर करून तयार करण्यात आलेल्या ड्रोणचा सर्वाधिक वापर करण्यात येत आहे. चीनच्या या प्रांताची सीमा भारताला लागलेली आहे. तसेच भारत आणि चीनमधील वादग्रस्त अक्साई चीन हा भागसुद्धा याच परिसरात आहे. दरम्यान, पक्षाच्या आकाराच्या या ड्रोणचे DOVE असे नामकरण करण्यात आले आहे.  भारताबरोबरच मंगोलिया. रशिया, कझाखस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान या देशांची सीमाही शिनजियांग प्रांताला लागून आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या भागाला चीन दहशतवादाचे केंद्र मानतो. त्यामुळेच चिनी सरकार या प्रांतावर करडी नजर ठेवून असतो.  हे ड्रोण खऱ्या पक्षाप्रमाणे उडू शकते. पक्षांच्या आकाराचे हे ड्रोण रडारच्या पकडीमध्ये येऊ शकत नाही, तसेच हे ड्रोण पक्षांच्या हालचालींची 90 टक्के नक्कल करू शकते, असे या प्रकल्पाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. सीमेवर तैनात करण्यापूर्वी या ड्रोणचे सुमारे 2 हजार वेळा परीक्षण करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पावर सुमारे 105 कोटी अब्ज रुपये खर्च झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारत