शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 4:53 PM

बगराम एअरबेस हा वीस वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ होता आणि अमेरिकेने येथूनच दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत.

वाशिंग्टन - तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच चीनअफगाणिस्तानातील सर्वात मोठा बगराम एअरबेस मिळविण्याच्या विचारात आहे. सध्याच्या परिस्थितीत तो भारताविरोधात पाकिस्तानचा वापर करेल. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या संयुक्त राष्ट्रांतील माजी डिप्लोमॅट आणि रिपब्लिकन नेत्या निक्की हेली, यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. बगराम एअरबेस हा वीस वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ होता आणि अमेरिकेने येथूनच दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हवाई हल्ले केले आहेत. (China trying to take over bagram air force base and use pakistan against india says Nikki Haley)अमेरिकेच्या नेत्या निक्की हेली यांनी बायडन प्रशासनाला सल्ला दिला आहे, की अमेरिकेने आपले मित्र देश भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि सर्व मित्र देशांशी घट्टपणे समन्वय बनविणे आवश्यक आहे. तसेच, त्यांना साथ देण्याचे आश्वासन देण्याचीही अत्यंत आवश्यकता आहे. याच बरोबर, तैवान, युक्रेन, इस्रायलसारख्या देशांनाच्याही पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे.

"भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

रिपब्लिकन नेत्या निक्की म्हणाल्या, अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याने जिहादींची हिंमत वाढली आहे. ते याला त्यांचा नैतिक विजय मानत आहे. आता ते जगभरात त्यांच्या संघटनेसाठी भरती सुरू करतील. अशा परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात मोठी मोहीम सुरू करायला हवी.

चीनवरही नजर ठेवण्याची आवश्यकता -माजी अमेरिकन डिप्लोमॅट म्हणाल्या, आपण स्वतःला पूर्णपणे सुरक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एकिकडे, रशिया सातत्याने सायबर हल्ले करत आहे. तर दुसरीकडे दहशतवाद वाढत आहे. आपल्याला चीनवरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्यासंदर्भात त्या म्हणाल्या, की बायडन प्रशासनाने अफगाण लोकांचा विश्वास गमावला आहे. तेथे जिहादी आनंद साजरा करत आहेत आणि आपण आपली कोट्यवधी डॉलर्सची अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रे त्यांच्यासाठी तेथे सोडली आहेत.

टॅग्स :chinaचीनAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनIndiaभारत