शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Corona Vaccine : कोरोना लशीसंदर्भात भारताचा 'जय-जयकार', चीनला अजीर्ण; सुरू केलं असं कटकारस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 9:43 AM

ग्लोबल टाइम्सने भारताच्या व्हॅक्सीन मैत्रीविरोधात अपप्रचाराला सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने सीरम इंस्टिट्यूटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर...

नवी दिल्ली -भारताच्या व्हॅक्सीन डिप्लोमसीने चीनला अजीर्ण झाले आहे. कोरोना महामारीत भारताच्या व्हॅक्सीन मैत्री अभियानाने चीनला दक्षिण आशियात बॅकफुटवर ढकलले आहे. यामुळे आता चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सने (Global Times) भारताच्या या अभियानाविरोधात अपप्रचार करायला सुरुवात केली आहे. तर, भारताने आधीच श्रीलंका, अफगानिस्तान आणि पाकिस्तान वगळता सर्व सार्क देशांना भारताच्या सीरम इंस्टिट्यूटची (SII) कोविशिल्ड (Covishield) लस गिफ्ट केली आहे.

अफगाणिस्तानला लवकरच पाठवली जाणार लस -भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लशीसंदर्भात चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानातील रेग्युलेटरकडून लशीच्या वापराला परवानगी मिळल्यानंतर त्यांना लस सप्लाय करण्यात येईल, असे भारताने म्हटले आहे. एवढेच नाही, तर अफगाणिस्तान आपल्या प्राधान्य क्रमात वर असल्याचा विश्वासही भारताने दिला आहे. भारताकडून श्रीलंकेला 27 जानेवारीला कोरोना लशीचे 5 लाख डोस देण्यात येणार आहेत.

भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर उपस्थित केला सवाल -ग्लोबल टाइम्सने भारताच्या व्हॅक्सीन मैत्रीविरोधात अपप्रचाराला सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्सने सीरम इंस्टिट्यूटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर भारताच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर चीनमध्ये राहणारे भारतीय चिनी लशीलाच अधिक प्राधान्य देत आहे, असा दावाही ग्लोबल टाइम्सने केला आहे. तसेच बीबीसीच्या वृत्ताचा हवाला देत, पेशन्ट्स राइट्स ग्रुप ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कचे म्हणणे आहे, की सीरमने कोविशील्डसंदर्भात ब्रिजिंग स्टडी पूर्ण केलेली नाही, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.

नेपाळमध्ये चिनी लशीला परवानगी नाही -ज्या देशांत राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या हात-पाय परसण्याची आणि त्यांच्यावर आपला प्रभाव निर्माण करण्याची चीनची मनिषा आहे, अशा देशांना चीनने लस देण्याचा प्रस्ताव दिला आहे. नेपाळमध्ये ड्रग रेग्युलेटरने अद्याप चिनी लशीला मंजुरी दिलेली नाही. तसेच, मालदीव सरकारच्या सूत्रांनीही म्हटले आहे, की चीनकडून कोविड 19 लशीच्या कुठल्याही प्रकारच्या सप्लायसंदर्भात कुठल्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाही. महत्वाचे म्हणजे, चीन शेजारील देश कंबोडियानेदेखील भारताकडे लस पुरविण्याचा आग्रह केला आहे. तसचे गेल्या आठवड्यातील रॉयटरच्या एका वृत्तानुसार, लशीच्या पुरवठ्यासंदर्भात बांगलादेश आणि चीनदरम्यान एकमत नाही.

अनेक देशांना भारताच्या लशीत रस -गेल्या आठवड्यातच भारताने म्हटले होते, की अनेक देशांना आपल्या लशीत रस आहे. आपण व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंगचे हब आहोत. एवढेच नाही, तर सरकारने असेही म्हटले आहे, की भारत भागिदार देशांना टप्प्याटप्प्याने लशीचा पुरवठा सुरूच ठेवेल. भारताकडून सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, मोरक्को, बांगलादेश आणि म्यानमारला लशीचा पुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतmedicineऔषधं