शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

Coronavirus : दुसऱ्या लाटेत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; चीन म्हणाला, "आम्ही मदतीसाठी तयार..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 7:50 PM

Coronavirus : भारतात सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. देशात अनेक ठिकाणी सध्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं निर्माण झालंय चित्र. यापूर्वी भारतानंही चीनला केली होती मदत.

ठळक मुद्देदेशात अनेक ठिकाणी सध्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं निर्माण झालंय चित्र.यापूर्वी भारतानंही चीनला केली होती मदत.

China Reacts on India’s Coronavirus Situation: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा भारताला जबर फटका बसताना दिसत आहे. दररोज देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. बुधवारी चोवीस तासांत देशात आतापर्यंतची सर्वाधिक ३ लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ झाली. एकीकडे रुग्णवाढ होत असली तरी दुसरीकडे, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड आणि आवश्यक त्या औषधांची कमतरता भासताना दिसत आहे. आता यावर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. आपण भारताच्या मदतीसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया चीनकडून गुरूवारी देण्यात आली. कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून वाचवण्यासाठी मदत आणि वैद्यकीय सामान देण्यासाठी आपण तयार असल्याचं चीननं म्हटलं आहे. अमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. "चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे," असं त्यांनी उत्तर देताना सांगितलं. आवश्यक ती मदत करू"भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल," असंही वांग म्हणाले. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.यापूर्वी भारतानंही केली होती मदतगेल्या वर्षी कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतानं चीनला मदत केली होती. भारतानं १५ टन मास्क याशिवाय अन्य वैद्यकीय मदत चीनला पुरवली होती. याशिवाय चीनला वैद्यकीय उपकरणांचाही पुरवठा केला होता. भारतानं वैद्यकीय मदतीमध्ये चीनला १ लाख सर्जिकल मास्क, पाच लाख सर्जिकल ग्लोव्ह्ज. चाक हजार N95 मास्क, ७५ फ्युजन पंप्स असं सामान पाठवलं असल्याची माहिती गेल्या वर्षी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनMedicalवैद्यकीय