शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

आता अफगाणिस्तानात मिलिट्री बेस उभारण्याचा चीनचा 'प्लान'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 5:31 PM

पाकिस्तानप्रमाणे चीन आता अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात लष्करी तळ उभारण्याची योजना आखत आहे. चीनची या संदर्भात अफगाणिस्तानबरोबर बोलणी सुरु आहेत.

ठळक मुद्दे. वाखान अफगाणिस्तानचा भाग असला तरी तिथे राहणा-या नागरिकांना अफगाणिस्तानच्या अन्य भागांमध्ये सुरु असलेले युद्ध, हिंसाचाराची कल्पना नसते.राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा चीनचा आर्थिक आणि भूराजकीय विस्तार करण्यावर भर आहे.

काबूल - पाकिस्तानप्रमाणे चीन आता अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात लष्करी तळ उभारण्याची योजना आखत आहे. चीनची या संदर्भात अफगाणिस्तानबरोबर बोलणी सुरु आहेत. अफगाणिस्तानचा वाखान कॉरिडोअर चीनच्या शिनजियांग प्रांताला लागून आहे. वाखानमार्गे दहशतवादी शिनजियांगमध्ये शिरु शकतात अशी भिती चीनला आहे. त्यामुळे चीन अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागाने व्यापलेल्या वाखान भागात लष्करी तळ उभारण्याच्या तयारीत आहे. 

सध्या या भागात चिनी आणि अफगाणी सैनिकांना संयुक्तपणे गस्त घालताना पाहण्यात आले आहे. वाखान अफगाणिस्तानचा भाग असला तरी तिथे राहणा-या नागरिकांना अफगाणिस्तानच्या अन्य भागांमध्ये सुरु असलेले युद्ध, हिंसाचाराची कल्पना नसते. इथले नागरिक शांततेत आपले जीवन जगत आहेत. वाखानमधल्या लोकांचे शिनजियांग प्रांतातील नागरिकांशी दृढ संबंध आहेत. 

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा चीनचा आर्थिक आणि भूराजकीय विस्तार करण्यावर भर आहे. दक्षिण आशियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर चीन अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. शिनजियांगमध्ये अशांतता असून वाखानमधून तेथे अस्थिरता निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे चीन अफगाणिस्तानात लष्करी तळ उभारण्याच्या विचारात आहे. इराक आणि सीरियामधून पळालेले इसिसचे दहशतवादी वाखानमार्गे चीनमध्ये घुसू शकतात असे तज्ञांचे मत आहे त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.  

पाकिस्तानात तळ उभारण्याचे प्रयत्न  चीन पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनची या संदर्भात पाकिस्तानबरोबर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने परवानगी दिल्यास चीनचा हा परदेशातील दुसरा लष्करी तळ ठरेल. याआधी आफ्रिका खंडातील डिजीबाऊटी या देशात चीनने आपला पहिला लष्करी तळ उभारला आहे. पाकिस्तानात जिवानी बंदरावर लष्करी तळ उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे. 

टॅग्स :chinaचीन