शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

Corona Vaccine: चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 9:26 PM

Corona Vaccine चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या तज्ज्ञांसह संशोधनामध्ये सहभागी झालेल्या अन्य वैज्ञानिकांनी सांगितले की, या चाचणीमध्ये कोरोना लसीची सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मुद्द्यांवर परिक्षण करण्यात आले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पहिल्या मानवी चाचणीचा अहवाल आला असताना चीनने दुसरी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. प्रसिद्ध मेडिकल जर्नल 'द लान्सेंट'मध्येच दोन्ही चाचण्यांचे अहवाल छापण्यात आले आहेत. 

चीनमध्ये कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष आला असून क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे आणि शरीरात अँटीबॉडी तयार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. चीनच्या रोग नियंत्रण केंद्राच्या तज्ज्ञांसह संशोधनामध्ये सहभागी झालेल्या अन्य वैज्ञानिकांनी सांगितले की, या चाचणीमध्ये कोरोना लसीची सुरक्षितता आणि प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या मुद्द्यांवर परिक्षण करण्यात आले. अंदाजापेक्षा हे आकडे अधिक चांगले आले आहेत. चाचणीमध्ये सहभागी झालेला कोणताही रुग्ण लसीचा डोस दिल्यानंतर कोरोना व्हायरस किंवा सार्स-कोव्हिड 2 बाधित झालेला नाही. यामुळे सध्याच्या टप्प्यात हे सांगणे कठीण आहे की औषधाने वायरसच्या संक्रमणाविरोधात प्रभावी सुरक्षा दिली की नाही. 

ब्रिटनच्या लंडनमधील इम्पेरियल कॉलेजचे तज्ज्ञ प्राध्यापक डॅनी अल्टमॅन यांनी सांगितले की, चीनचे संशोधन सामान्य सर्दी-ताप व्हाय़रसवर आधारित आहे. ज्याच्याविरोधात लोकांच्या शरीरात आधीपासूनच अँटीबॉडी असतात. या संशोधनाशी डॅनी यांचा काहीही संबंध नाहीय. संशोधकांनुसार 508 लोकांवर कोरोनाच्या लसीची चाचणी करण्यात आली. यामध्ये निरिक्षणाअंती असे समोर आले की, लस घेतलेल्या 65 टक्के रुग्ण आणइ कमी लस दिलेल्या 91 टक्के रुग्णांमध्ये लसीकरणाच्या 28 दिवसांनी टी सेल किंवा अँटीबॉडी सुरक्षेसाठी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. 

ऑक्सफर्डची भारतात बनवणार लस

आदार पुनावाला यांनी सांगितले की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पामध्ये कोरोनाचे उत्पादन सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. मोठ्या प्रमाणावर या व्हॅक्सीनचे उत्पादन केले जाणार आहे. यासाठी या आठवड्यात आम्ही परवानगी घेण्यासाठी जाणार आहोत. डिसेंबरपर्यंत ऑक्सफर्डच्या Covishield चे 300-400 दशलक्ष डोस बनविले जाणार आहेत.  कोरोना लसीची किंमत भारतासाठी 1000 रुपयांच्या आसपास असेल असे पुनावाला यांनी सांगितले. जग कोरोनाशी लढत आहे, यासाठी आम्ही या लसीची किंमत कमी ठेवणार आहोत. सुरुवातीला जास्त फायदा पाहिला जाणार नाही. लसीची मागणी प्रचंड असणार आहे. यासाठी आम्हाला लसीचे उत्पादन आणि वितरणाची खूप गरज लागणार आहे. सरकारी यंत्रणेवर सारे अवलंबून असणार आहे, असे ते म्हणाले.  याआधी कोणत्याही लसीसाठी एवढी मेहनत करावी लागली नाही. आम्ही कोरोना लसीमुळे अन्य कोणत्याही उत्पादनावर लक्ष देऊ शकलो नाही. कोरोनाचे वाढते संकट पाहता पुढील दोन तीन वर्षे या लसीवरच फोकस करावा लागणार आहे. कारण सर्व जग या महामारीच्या विळख्यात आले आहे, असेही पुनावाला म्हणाले.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

चांदी चकाकली! सोन्याच्या किंमतीतही बदल; जाणून घ्या दर

Kia लवकरच छोटी एसयुव्ही लाँच करणार; जाणून घ्या किंमत किती असणार

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या