भ्रष्टाचाराचा कळस! माजी महापौराच्या घरात आढळली 13.5 टन सोने अन् 23 टन रोख रक्कम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:10 IST2026-01-29T19:10:37+5:302026-01-29T19:10:53+5:30

भ्रष्ट महापौराला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा.

China news, height of corruption! 13.5 tons of gold and 23 tons of cash found in the mayor's house | भ्रष्टाचाराचा कळस! माजी महापौराच्या घरात आढळली 13.5 टन सोने अन् 23 टन रोख रक्कम...

भ्रष्टाचाराचा कळस! माजी महापौराच्या घरात आढळली 13.5 टन सोने अन् 23 टन रोख रक्कम...

चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. एका शहराच्या माजी महापौराने इतक्या प्रचंड प्रमाणात सोने आणि रोख रक्कम जमा केली होती की, तपास यंत्रणांनाही धक्का बसला. घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 13.5 टन शुद्ध सोने आणि 23 टन वजनी रोख रक्कम, तसेच अनेक आलिशान गाड्या आढळल्या. या प्रकरणात संबंधित महापौराला थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हैकौ शहरातील माजी महापौरावर कारवाई

विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण हैकौ शहराचे माजी महापौर झांग की यांच्याशी संबंधित आहे. तपास यंत्रणांनी त्यांच्या घरावर छापा टाकला असता, एका गुप्त बेसमेंटमधून मोठ्या प्रमाणावर सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

सोन्याच्या विटा; अब्जावधींची रोकड

छाप्यादरम्यान 13.5 टन शुद्ध सोन्याच्या विटा, 23 टन रोख रक्कम (ज्यात विविध देशांची चलने व नोटा), चीन आणि परदेशातील आलिशान मालमत्ता, महागडे हॉटेल्स, व्हिला आणि लक्झरी कार्स जप्त करण्यात आल्या. एकूण संपत्तीचे मूल्य अब्जावधी डॉलर्समध्ये असल्याचा अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भ्रष्टाचारातून उभी राहिली प्रचंड संपत्ती

तपासात उघड झाले की, महापौरांनी आपल्या सुमारे 10 वर्षांच्या कार्यकाळात सरकारी गुत्ते, जमीन व्यवहार आणि बांधकाम प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात लाच घेतली. या बेकायदेशीर पैशांचा वापर करून परदेशी बँक खात्यांमध्ये पैसे जमा केले आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून रक्कम हस्तांतर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

न्यायालयाचा कठोर निर्णय

चीनच्या न्यायालयाने झांग की यांना भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि सरकारी निधीची अफरातफर या आरोपांखाली दोषी ठरवले. शिक्षा सुनावताना न्यायालयाने स्पष्ट केले की, हा गुन्हा समाजासाठी अत्यंत गंभीर असून, पक्षाच्या कठोर धोरणानुसार कोणतीही माफी दिली जाऊ शकत नाही. दरम्यान, ही कारवाई चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ अँटी-करप्शन मोहिमेचा भाग आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत अनेक उच्चपदस्थ अधिकारी, लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे, तर काही प्रकरणांची चौकशी अद्याप सुरू आहे.

Web Title : चीनी मेयर का भ्रष्टाचार: टनों सोना और नकदी जब्त!

Web Summary : एक पूर्व चीनी मेयर को मौत की सजा सुनाई गई क्योंकि अधिकारियों ने उसके घर में 13.5 टन सोना और 23 टन नकदी जब्त की। जांच में भूमि सौदों और निर्माण परियोजनाओं में व्यापक रिश्वतखोरी का पता चला, जिससे चीन के भ्रष्टाचार विरोधी अभियान पर प्रकाश डाला गया।

Web Title : Chinese Mayor's Corruption: Tons of Gold and Cash Seized!

Web Summary : A former Chinese mayor was sentenced to death after authorities discovered 13.5 tons of gold and 23 tons of cash in his home. The investigation revealed widespread bribery involving land deals and construction projects, highlighting China's anti-corruption campaign.