फाशीच्या शिक्षेत चीन नंबर १! सौदी अरब आणि इराणलाही मागे टाकत गुन्हेगारांना दिला मृत्यूदंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 19:46 IST2026-02-02T19:45:53+5:302026-02-02T19:46:50+5:30

२०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चीनने आपल्या आक्रमक धोरणाचे दर्शन घडवले आहे.

China is number 1 in capital punishment! Surpassing Saudi Arabia and Iran in executing criminals | फाशीच्या शिक्षेत चीन नंबर १! सौदी अरब आणि इराणलाही मागे टाकत गुन्हेगारांना दिला मृत्यूदंड

फाशीच्या शिक्षेत चीन नंबर १! सौदी अरब आणि इराणलाही मागे टाकत गुन्हेगारांना दिला मृत्यूदंड

जगभरात मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सौदी अरब आणि इराणला आता चीनने मागे टाकले आहे. २०२६ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चीनने आपल्या आक्रमक धोरणाचे दर्शन घडवले आहे. जानेवारी २०२६ या एकाच महिन्यात चीनने तब्बल १५ जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. विशेष म्हणजे, याच काळात सौदी आणि इराणमध्ये फाशीची एकही घटना नोंदवण्यात आलेली नाही.

ड्रग्ज आणि फसवणुकीच्या अड्ड्यांचा केला खात्मा

'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने म्यानमारमधील कुप्रसिद्ध 'बाय' कुटुंबाशी संबंधित ४ जणांना फाशी दिली आहे. हे कुटुंब एका मोठ्या घोटाळ्याच्या केंद्राशी संबंधित होते. यानंतर २९ जानेवारीला 'मिंग' कुटुंबातील ११ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. या कुटुंबांनी म्यानमारमधील एका शहराला जुगार, ड्रग्ज आणि सायबर फसवणुकीचा अड्डा बनवले होते. या गुन्हेगारी सिंडिकेटचा बीमोड करण्यासाठी चीनने हे कठोर पाऊल उचलले आहे.

२०२५ मध्ये सौदी अरबने मोडला होता विक्रम

२०२५ मध्ये सौदी अरब फाशीच्या शिक्षेत जगात आघाडीवर होता. अधिकृत आकडेवारीनुसार, सौदीने गेल्या वर्षी ३५६ लोकांना फाशी दिली होती, जो एक ऐतिहासिक रेकॉर्ड ठरला. यातील २४३ गुन्हेगार हे अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित होते. सौदीने २०२२ पासून ड्रग्ज प्रकरणांत पुन्हा मृत्यूदंडाची शिक्षा लागू केल्यामुळे हा आकडा वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

इराण आणि इराकची स्थिती काय?

२०२४ आणि २०२५ मध्ये इराण आणि इराक हे फाशीच्या शिक्षेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये इराणमध्ये ९७२ जणांना फाशी देण्यात आली होती, तर इराकमध्ये ६३ जणांना मृत्यूदंड मिळाला होता. चीनमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने फाशी दिली जाते, असा अंदाज वर्तवला जातो; मात्र चीन आपली आकडेवारी कधीही अधिकृतपणे जाहीर करत नाही, त्यामुळे तिथले वास्तव जगासमोर येत नाही.

Web Title : फांसी की सजा में चीन नंबर 1, सऊदी अरब और ईरान को भी पछाड़ा

Web Summary : चीन फांसी की सजा देने में सबसे आगे, सऊदी अरब और ईरान को पीछे छोड़ा। जनवरी 2026 में चीन ने 15 लोगों को फांसी दी, जो म्यांमार में ड्रग्स और धोखाधड़ी से जुड़े थे। 2025 में सऊदी अरब 356 फांसी के साथ सबसे आगे था।

Web Title : China Tops in Executions, Surpasses Saudi Arabia and Iran

Web Summary : China leads in executions, surpassing Saudi Arabia and Iran. In January 2026, China executed 15 people, mainly linked to drug and fraud rings dismantled in Myanmar. Saudi Arabia led in 2025 with 356 executions, while Iran and Iraq followed closely.