अमेरिका, इस्रायला मोठा धक्का! चीननं घेतली युद्धात उडी; इराणला २ लाख डॉलरसह आवश्यक मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:41 IST2026-03-13T16:43:14+5:302026-03-13T17:41:43+5:30

इराण युद्धात धोकादायक क्लस्टर बॉम्ब वापरत आहे, ज्यामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

China has now taken a leap into the US-Israel war; will provide Iran with $200,000 in necessary assistance | अमेरिका, इस्रायला मोठा धक्का! चीननं घेतली युद्धात उडी; इराणला २ लाख डॉलरसह आवश्यक मदत करणार

अमेरिका, इस्रायला मोठा धक्का! चीननं घेतली युद्धात उडी; इराणला २ लाख डॉलरसह आवश्यक मदत करणार

मध्य पूर्वतील युद्धाला आज १४ दिवस झाले आहेत. तिथली परिस्थिती आजही गंभीर बनली आहे. या युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्ट दिसत आहेत. त्यातच चीननेइराणच्या मदतीसाठी २ लाख डॉलर देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम चीन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून इराणला देणार असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. मानवतेच्या दृष्टीने इराणला आवश्यक ते सहकार्य केले जाईल. जेणेकरून तिथल्या लोकांना कठीण परिस्थितीत उभारण्यासाठी मदत मिळू शकते असं चीनने म्हटलं आहे.

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ येथून प्रवास करणाऱ्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांसह इराणच्या कडक देखरेखी आणि लष्करी कारवायांमुळे या सागरी मार्गावरील जहाजांच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. होर्मुझ येथील ही स्थिती पाहता अमेरिकेने रशियाच्या तेल खरेदीवर ३० दिवसांसाठी निर्बंध हटवले आहेत. युद्धामुळे जागतिक बाजारावर होणारा परिणाम स्थिर करण्यासाठी ही पाऊले उचलली आहेत. शुक्रवारी सकाळी आशियात तेल किंमतीत घट झाल्याचे दिसून आले.

इराणने क्लस्टर बॉम्बने केला हल्ला 

इराण युद्धात धोकादायक क्लस्टर बॉम्ब वापरत आहे, ज्यामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. इराण आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये लहान क्लस्टर बॉम्बचा समावेश करत आहे. हे विशेष बॉम्ब उंचावरून सोडले तर ते ११ ते १३ किलोमीटरपर्यंत पसरण्याची आणि मारा करण्याची क्षमता ठेवतात. लेबनॉनमध्येही हवाई हल्ले सुरू आहेत. इस्रायलचे हल्ले लेबनॉनला हादरवत आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये सर्वात जास्त विनाश दिसून आला आहे. जिथे बॉम्बस्फोटामुळे घरं, झाडे आणि स्थानिक पायाभूत सुविधांभोवतीच्या विकासाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

युद्धामुळे अमेरिकेला फायदा 

दरम्यान, अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक विधान चर्चेत आहे. युद्धामुळे कच्च्या तेलची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती अमेरिकेला आर्थिक फायदा देऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title : अमेरिका-इज़राइल संघर्ष में चीन की एंट्री, ईरान को मदद का प्रस्ताव

Web Summary : मध्य पूर्व संघर्ष के बीच, चीन ने मानवीय सहायता के लिए अपने रेड क्रॉस के माध्यम से ईरान को $200,000 देने का वादा किया। संघर्ष से तेल और गैस की आपूर्ति प्रभावित होती है, जिससे अमेरिका को रूसी तेल पर प्रतिबंध कम करने के लिए प्रेरित किया जाता है। ईरान द्वारा क्लस्टर बमों का कथित उपयोग चुनौतियां पेश करता है। बढ़ते तेल की कीमतें अमेरिका को लाभ पहुंचा सकती हैं।

Web Title : China Enters US-Israel Conflict, Offers Aid to Iran

Web Summary : Amidst the Middle East conflict, China pledges $200,000 to Iran via its Red Cross for humanitarian aid. The conflict impacts oil and gas supplies, leading the US to ease restrictions on Russian oil. Iran's alleged use of cluster bombs poses challenges. Rising oil prices may benefit America.