'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:21 IST2025-12-30T14:00:34+5:302025-12-30T14:21:54+5:30
गलवान तणावावर आता एक चित्रपट येत आहे. यावरुन आता चीन संतापला आहे. चीनने आता "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटातील तथ्ये नाकारण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाईम्स या चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी प्रथम सीमा ओलांडली.

'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटाचा टीझर फक्त भारतातच नाही तर चीनमध्येही खळबळ माजवत आहे. गलवानमध्ये चिनी विश्वासघाताला प्रत्युत्तर देताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष बाबूच्या व्यक्तिरेखेचे चित्रण करणारा हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यानस आता या चित्रपटाच्या टीझरमुळे चीन संतापला आहे.
चीनचे अधिकृत मुखपत्र असलेल्या 'द ग्लोबल टाईम्स'ने चित्रपटाच्या टीझरवर एक लेख प्रसिद्ध केला आहे. 'कोणत्याही प्रकारची सिनेमॅटिक सर्जनशीलता किंवा अतिशयोक्तीपूर्ण कथानक इतिहासाचे पुनर्लेखन करू शकत नाही किंवा चीनच्या सार्वभौम प्रदेशाचे रक्षण करण्याच्या पीएलएच्या संकल्पाला धक्का देऊ शकत नाही, असे या लेखात म्हटले आहे.
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
'सलमान खान, जो चिनी प्रेक्षकांना बजरंगी भाईजानमधील मुख्य अभिनेता म्हणून ओळखला जातो, त्याला चिनी नेटिझन्स अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण वाटणाऱ्या भूमिका साकारल्याबद्दल चिडवतात, कथा खूप सोप्या आहेत आणि दृश्य परिणाम इतके अतिरंजित आहेत की नाटक कृत्रिम वाटते, असेही ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे.
"बॅटल ऑफ गलवान" चा टीझर चीनला लागला
चित्रपटात सलमान खान कर्नल बिक्कुमाला संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ग्लोबल टाईम्सनुसार, २०२० च्या गलवान व्हॅली संघर्षातील कथित भूमिकेमुळे कर्नल संतोष बाबू भारतीय माध्यमांच्या केंद्रस्थानी आले होते.
'काही नेटिझन्सनी चित्रपटाच्या टीझरची तुलना गेम ऑफ थ्रोन्समधील एका दृश्याशी केली आहे.चित्रपटाने त्याची कॉपी केली आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबोचा हवाला देत, वृत्तपत्राने वाचकांचे लक्ष चिनी वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांकडे वेधले. "किंगनिंग र्यू व्ही" हँडल असलेल्या एका वेइबो वापरकर्त्याने टिप्पणी केली की भारतीय "ओव्हर-द-टॉप" चित्रपट तथ्यांशी पूर्णपणे विसंगत आहे, असंही ग्लोबल टाईम्सने वृत्त दिले आहे.