शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 20:01 IST

चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील.

ठळक मुद्देचीनच्या एका वरिष्ठ जनरलने म्हटले आहे, की तैवानला स्वतंत्र राहण्यापासून रोखण्याचा कुठलाही मार्ग नसेल, तर हल्ला केला जाईल.युद्धाची धमकी देणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघण असल्याचे तैवानने म्हटले आहे. 'तैवानचे नागरिक हुकूमशाही आणि हिंसेची निवड कधीही करणार नाही, असेही तैवानने म्हटले आहे

बिजिंग : संपूर्ण जगात कोरोनाचा सामना करण्यात व्यस्त आहे. मात्र, चीन शेजारील देशांच्या कुरापती काढत आहे. आता चीनने तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. चीनच्या एका वरिष्ठ जनरलने म्हटले आहे, की तैवानला स्वतंत्र राहण्यापासून रोखण्याचा इतर कुठलाही मार्ग नसेल, तर  त्याच्यावर हल्ला केला जाईल. यावर तैवाननेही चीनला चोख उत्तर दिले आहे. युद्धाची धमकी देणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघण असल्याचे तैवानने म्हटले आहे. 

चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील. ली जुओचेंग बिजिंगच्या ग्रेट हॉलमधील एका कार्यक्रमातही म्हणाले होते, 'आम्ही बल प्रयोग सोडण्याचे वचन देत नाही आणि तैवानमध्ये स्थिरता ठेवण्यासाठी सर्वप्रकारचे आवश्यक उपाय खुले ठेवणार आहोत.' 

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

जुओचेंग यांच्या वक्तव्यावर तैवानच्या चीन प्रकरणांशी संबंधित असलेल्या परिषदेने म्हटले आहे, 'तैवानचे नागरिक हुकूमशाही आणि हिंसेची निवड कधीही करणार नाही. समस्या सोडविण्याचा मार्ग बल प्रयोग आणि एकतरफी निर्णय असू शकत नाही.' चीनसाठी तैवान प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. चीन या बैटाला आपा भाग मानतो. चीनने अनेक वेळा म्हटले आहे, की गरज पडल्यास तैवानला बळाच्या सहाय्याने अधिपत्याखाली घेतले जाईल. 

भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

अमेरिकेने घेतला असा निर्णय -अमेरिकेने काँग्रेसला (संसद) सूचित केले आहे, की ते तैवानला 18 कोटी डॉलर्सच्या अत्याधुनिक टॉरपीडोची  संभाव्य विक्री करू शकतात. अमेरिकेच्या संरक्षण सहकार्य एजेन्सीने नुकतेच सांगितले होते, की अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तैवानला 18 एमके-48 मॉड 6 टॉरपीडो आणि संबंधित उपकरणांची विक्री करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यानंतर चीनने असे पाऊल उचलले आहे.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUSअमेरिकाUnited Statesअमेरिका