भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:54 AM2020-05-29T11:54:32+5:302020-05-29T12:15:35+5:30

ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही सूचित केले आहे, की अमेरिका सीमा वादात मध्यस्थीसाठी तयार, इच्छुक आणि सक्षम आहे.

india and china do not need to help to overcome standoff in ladakh says chinese media sna | भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा

googlenewsNext
ठळक मुद्देसध्याचा वाद भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यास सक्षम आहेत, असे चीनने म्हटले आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, भारत वास्तविक सीमा रेषेवर शांतता कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे.

पेइचिंग : भारत-चीनसीमा वादात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सक्रियता दाखवताच चीन नरमल्याचे दिसते एकीकडे चीनचे भारतातील राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे, की दोन्ही देशांना एकमेकांचा धोका नाही. तर चीन सरकारच्या प्रॉपगॅन्डा मॅगझीन ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे, की चीन आणि भारताला सध्या सीमेवर सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची आवश्यकता नाही.

काय म्हणाले होते ट्रम्प -
ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते, की आम्ही भारत आणि चीन या दोघांनाही सूचित केले आहे, की अमेरिका सीमा वादात मध्यस्थीसाठी तयार, इच्छुक आणि सक्षम आहे. चीनीच्या परराष्ट्र मत्रालयाकडून ट्रम्प यांच्या ट्विटसंदर्भात कसल्याही प्रकारची आधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की दोन्ही देशांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या, मदतीची आवश्यकता नाही.

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

भारत-चीन द्विपक्षीय चर्चेतून वाद सोडवण्यास सक्षम -
या लेखात म्हणण्यात आले आहे, की सध्याचा वाद भारत आणि चीन द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यास सक्षम आहेत. या भागातील शांतता आणि सद्भावना नष्ट करण्याची नेहमीच संधी शोधणाऱ्या अमेरिकेपासून दोन्ही देशांनी सावध रहायला हवे. 

चीनसोबत चर्चा सुरू -
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले, भारत वास्तविक सीमा रेषेवर शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच भारतीय सैनिक सीमेवरील व्यवस्थापनासंदर्भात अत्यंत जबाबदारीने कार्य करत आहेत. तसेच सीमावर्ती भागात निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी दोघांनीही सैन्य आणि राजकीय स्थरावर एक सिस्टिम तयार केले आहे. या माध्यमाने चर्चा सुरू असते.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

भारत आणि चीनला एकमेकांना धोका नाही -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसंदर्भात कठोर भूमिका घेतल्यानंतर जिनपिंगही काही प्रमाणात नरमल्याचं पाहायला मिळतं आहे. लडाखमधील चीनच्या या हालचाली रोखण्यासाठी मोदींची भूमिका निर्णायक ठरत असल्याची आता चर्चा आहे. भारताकडून कडक संदेश मिळाल्यानंतर आता चीननंही भूमिका बदलली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव आणि चिनी माध्यमांमधील आक्रमक वक्तृत्वानंतर चीनने आता सौम्य भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीनला एकमेकांना धोका नसल्याचे भारताचे चिनी राजदूत सुन विडोंग यांनी म्हटले आहे. द्विपक्षीय सहकार्याने दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशीही त्यांनी आशा व्यक्त केली आहे.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

Web Title: india and china do not need to help to overcome standoff in ladakh says chinese media sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.