शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

China Flood 2024 : चीनमध्ये पूरस्थिती, सर्वत्र पाणीच पाणी; 24 तासांत कोसळळा वर्षभराएवढा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:36 IST

china flood 2024 : सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे. अचानक आलेल्या पुरामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

चीनमध्ये अचानक पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. येथे गेल्या केवळ 24 तासांतच वर्षभरात होतो तेवढा पाऊस झाला आहे. यामुळे चीनमधील 31 नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे. अचानक आलेल्या पुरामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

नानयांग शहरात दाफेंगयिंगमध्ये एकाच दिवसात 606.7 मिमी (24 इंच) पाऊस -हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नानयांग शहरात दाफेंगयिंगमध्ये एकाच दिवसात 606.7 मिमी (24 इंच) पाऊस नोंदवल्या गेला. वर्षाचा विचार करता या भागात सरासरी 800 मिमी एवढा पाऊस पडतो. तसेच, हेनान प्रांतातील  अधिकाऱ्यांनी खराब हवामानामुळे हाय अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने हेनान, शेडोंग आणि अनहुई प्रांतात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.

नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी, अडकलेल्यांना बाहेर काढले -चीनमधील CGTN च्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी हेनान प्रांतातील नानयांगच्या डेंगझोऊ शहरात पाणी धोकादायक पातळीवर पोहोचले होते. वाढत्या पाणीपातळीमुळे अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. बचाव पथकाने घरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर, बीजिंग अनेक शहरांतील ट्रेन बंद केल्या आहेत. वायव्य प्रांतातील गांसूमधील कांग काउंटीनेही पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

चीनने आपले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस डॅमचे दरवाजेही उघडले -आशिया खंडात पावसाचा सर्वाधिक फटका चीनवर बसला आहे. चीनमध्ये पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. चीनमधील 31 नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक धरणंही भरली आहे. एवढेच नाही तर, चीनने आपले सर्वात मोठे धरण थ्री गॉर्जेस डॅमचे दरवाजेही उघडले आहेत. याशिवाय, नेपाळ, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातही जबरदस्त पाउस झाला आहे. 

टॅग्स :chinaचीनRainपाऊसfloodपूर