शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

धक्कादायक माहिती! भारताविरुद्ध नेपाळच्या बदललेल्या भूमिकांमागे फक्त चीनचा हात नव्हे तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:23 AM

मिळालेल्या माहितीनुसार, जिथे चीन नेपाळमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करून रणनीतिकदृष्ट्या भारताला वर्षानुवर्षे घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देचीनचा नेपाळमध्ये वर्चस्व प्रस्थापित करून रणनीतिकदृष्ट्या भारताला वर्षानुवर्षे घेरण्याचा प्रयत्ननेपाळमध्ये प्रभाव टाकून अमेरिकेची भारत आणि चीन या दोन्ही देशांवर नजर ठेवण्याची इच्छाअमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये गुप्तचर कारवाई सुरु केली आहे

नवी दिल्ली – भारताविरोधातनेपाळच्या भूमिकेत झालेल्या बदलामागे फक्त चीन नव्हे तर अमेरिकेची रणनीतीही काम करत आहे. नेपाळच्या बदललेल्या पवित्र्यामागे अमेरिका आणि चीनमधील तणाव कारणीभूत असल्याचं मानलं जातं. हे दोन्ही देश नेपाळमध्ये भारताचा प्रभाव कमी करुन नेपाळ सरकार आणि तेथील संसाधने ताब्यात घेण्याचा डाव आखत आहेत. नेपाळमधील सरकारी यंत्रणा ताब्यात घेण्यासाठी अमेरिका आणि चिनी संस्था यांच्यात स्पर्धा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिथे चीन नेपाळमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करून रणनीतिकदृष्ट्या भारताला वर्षानुवर्षे घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर नेपाळमध्ये प्रभाव टाकून अमेरिकेची भारत आणि चीन या दोन्ही देशांवर नजर ठेवण्याची इच्छा आहे. यासाठी अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने अनेक वर्षांपासून तेथे गुप्तचर कारवाई केली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेने सर्वप्रथम नेपाळमधील जोशुआ -१ नावाच्या ऑपरेशन अंतर्गत राजशाही संपविली. तेथे लोकशाही सरकारला मजबूत स्थितीत नेले. यानंतर, ऑपरेशन जोशुआ -२ अंतर्गत नेपाळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरकार ठामपणे ठेवण्याच्या कारवायांमागे अमेरिकन गुप्तचर यंत्रणाही होती.

आता ऑपरेशन जोशुआ -3 सुरू

अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार गुप्तचर संस्था सीआयएने आता जोशुआ-३ ऑपरेशन सुरू केले आहे, ज्याचे उद्दिष्ट नेपाळ आणि त्याचे सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत करुन अमेरिकन मदतीवर अवलंबून ठेवणे हे आहे. या उद्देशाने नेपाळमध्ये दोन अमेरिकन एजन्सी पीस कॉर्प्स आणि मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन मोठ्या प्रमाणात निधी गुंतविण्यात गुंतल्या आहेत. दुसरीकडे, चीन फारसे मागे नाही आणि बीआरआय म्हणजेच बेल्ट रोड इनिशिएटिव्ह व इतर प्रकल्पांच्या माध्यमातून नेपाळमधील भारताचा प्रभाव संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनने इंटेलिजेंस एजन्सीशी संबंधित असलेल्या हाओ यानकी यांना नेपाळचे राजदूत म्हणून पाठवले आहे.

नेपाळमध्ये चिनी राजदूत गुप्तचर समितीत होते

हाओ यांकी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या गुप्तचर समितीवर कार्यरत आहेत आणि चिनी गुप्तचर संस्था राज्य सुरक्षा मंत्रालयाशी संबंधित आहेत. नेपाळच्या आधी हाओ याँकी युरोपच्या कारभारावर लक्ष ठेवत होती. नेपाळमधील अमेरिकन योजना अयशस्वी करण्यासाठी आणि भारताचा प्रभाव संपुष्टात आणण्यासाठी हाओ यानकी यांनी केपी ओली सरकारबरोबर एक चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. याचाच परिणाम म्हणून आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान प्रचंड हेदेखील ओलीची खुर्ची हिसकावून घेण्याच्या आपल्या आग्रही मागणीपासून मागे हटताना दिसत आहेत.

चीनच्या हस्तक्षेपानंतरच नेपाळ सरकारमधील सध्या सुरू असलेला राजकीय पेच शांत झाल्याचं दिसत आहे. अमेरिका आणि चीन दोघांनाही नेपाळ सरकारवर आपला प्रभाव वापरायचा आहे आणि त्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. बर्‍याच गोष्टींसाठी अनेक वर्षांपासून भारतावर अवलंबून असलेल्या नेपाळने आता दोन देशांचे पर्याय पाहून भारताच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :IndiaभारतNepalनेपाळchinaचीनAmericaअमेरिका