इयत्ता पाचवी व त्यावरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा, शिकागोतील शाळांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:29 AM2021-07-10T11:29:14+5:302021-07-10T11:36:14+5:30

Chicago Schools : प्रशासनाच्या या आदेशानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

Chicago Schools To Provide Free Condoms To Students As Young As 10 Years Old | इयत्ता पाचवी व त्यावरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा, शिकागोतील शाळांना आदेश

इयत्ता पाचवी व त्यावरील मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करा, शिकागोतील शाळांना आदेश

Next
ठळक मुद्देहे धोरण डिसेंबर 2020 मध्ये तयार करण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आला नाही. मुलांमधील लैंगिक आजार, एचआयव्ही संसर्ग आणि अनावश्यक गर्भधारणा रोखण्याचा यामागील तर्क असल्याचे म्हटले जात आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील शिकागो शहरातील शाळांसाठी जारी करण्यात आलेल्या एका आदेशानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नव्या शालेय धोरणानुसार शाळांना पाचवी आणि त्यावरील इयत्तेतील मुलांसाठी मोफत कंडोमची (निरोध) व्यवस्था करण्यास सांगितले आहे. म्हणजेच शाळा 10 वर्षाच्या मुलांसाठी कंडोमची व्यवस्था करतील. प्रशासनाच्या या आदेशानंतर सोशल मीडियावर लोकांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. या निर्णयला लज्जास्पद आणि आजारी मानसिकता असल्याचे लोकांनी म्हटले आहे.

शिकागो पब्लिक स्कूल बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या नव्या धोरणानुसार शाळांना पाचवी व त्यावरील इयत्तेत शिकणाऱ्या मुलांसाठी मोफत कंडोमची व्यवस्था करावी लागणार आहे. मुलांमधील लैंगिक आजार, एचआयव्ही संसर्ग आणि अनावश्यक गर्भधारणा रोखण्याचा यामागील तर्क असल्याचे म्हटले जात आहे. हे धोरण डिसेंबर 2020 मध्ये तयार करण्यात आले होते. मात्र, कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आला नाही. 

शिकागोमध्ये पुढील महिन्यापासून शाळा सुरू होणार आहेत. दरम्यान, नवीन शालेय धोरणाबाबत नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. एका युजरने हा निर्णय मानसिक आजारपणाचे लक्ष असल्याचे म्हटले. तर, या देशाला अखेर काय झालंय? असा सवाल केला आहे. अँण्ड्र्यू पोलक नावच्या व्यक्तीने ट्विटरवर म्हटले आहे की, "शिकागो एलिमेंट्री शाळांमध्ये मोफत कंडोमची व्यवस्था करेल. मात्र, गँग्जच्या विरोधात कारवाईबाबत काय मत आहे? कारण, मुले शाळांमध्ये गोळीबाराच्या भयाशिवाय मुक्तपणे शाळेत जाऊ शकतील." 

अँण्ड्र्यू पोलक यांच्या ट्विटवर इतर लोकांना तीव्र प्रतिक्रिया देत नवीन शालेय धोरणावर  नाराजी व्यक्त केली. दरम्यान, अमेरिकेत अनेकदा गोळीबाराच्या घटना घडतात. अशा घटनांमध्ये अनेकदा शालेय विद्यार्थी, अल्पवयीन मुलांनाही लक्ष्य केले जाते.

Web Title: Chicago Schools To Provide Free Condoms To Students As Young As 10 Years Old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.