OMG! पोटाऐवजी महिलेच्या लिव्हरमध्ये आढळलं भ्रूण, अल्ट्रासाउंड रिपोर्ट बघून डॉक्टरची बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:18 IST2021-12-16T18:15:30+5:302021-12-16T18:18:07+5:30
Canada Pregnancy Rare case : एक प्रेग्नेंट महिला जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका विचित्र (Pregnancy Rare case) स्थितीचा खुलासा करण्यात आला.

OMG! पोटाऐवजी महिलेच्या लिव्हरमध्ये आढळलं भ्रूण, अल्ट्रासाउंड रिपोर्ट बघून डॉक्टरची बोलती बंद
आई होणं ही कोणत्याही महिलेसाठी सर्वात आनंदाची बाब असते. बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या केवळ आयुष्यातच नाही तर शरीरातही बदल होतो. असं असूनही महिला त्यांची प्रेग्नन्सी एन्जॉय करतात. पण प्रत्येकजण नशीबवान नसतं. जगात अनेक महिलांना त्यांच्या प्रेग्नेन्सीत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक विचित्र प्रेग्नेन्सी केस कॅनडात (Canada) समोर आली आहे. इथे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका विचित्र (Pregnancy Rare case) स्थितीचा खुलासा करण्यात आला.
कॅनेडिअन पेडिअट्रिशन डॉ. मायकल यांनी या केसची माहिती त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. डॉ. मायकल म्हणाले की, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अनेक प्रकारच्या केसेस पाहिल्या, पण अशी केस कधीच पाहिली नाही. डॉक्टर मायकल यांच्याकडे ३३ वर्षीय महिला आपल्या उपचारासाठी आली होती. महिलेची पाळी १४ दिवस राहत होती आणि गेल्या दीड महिन्यांपासून तिला पाळी येत नव्हती. त्यामुळे ती डॉक्टरकडे प्रेग्नेन्सी कन्फर्म करण्यासाठी गेली होती.
डॉक्टरला पूर्ण विश्वास होता की, महिला प्रेग्नेंट आहे. फक्त कन्फर्म करण्यासाठी डॉक्टरने महिलेचा अल्टासाउंड केला. या अल्ट्रासाउंड रिपोर्टने डॉक्टरसह महिलेलाही हैराण केलं. महिला प्रेग्नेंट तर होती, पण तिचं बाळ गर्भ पिशवीत नव्हतं. संबंध ठेवल्यावर कसेतरी स्पर्म महिलेच्या लिव्हरमध्ये गेले होते. त्यामुळे भ्रूण महिलेच्या लिव्हरमध्ये वाढू लागलं होतं. डॉक्टरने सांगितलं की, महिलेच्या लिव्हरमध्ये एक्टोपिक प्रेग्नेन्सी आढळून आली आहे. एक्टोपिक प्रेग्नेन्सी तेव्हा होते जेव्हा एग फॅलोपियन ट्यूबमध्ये चुकीच्या दिशेने ट्रॅव्हल करू लागतात. आणि त्यामुळे प्रेग्नेन्सी योग्यपणे होत नाही.
हे पाहिल्यानंतर डॉक्टरने लगेच महिलेची सर्जरी केली. सर्जरी करून महिलेचा जीव वाचवण्यात आला. पण भ्रूण आधीच लिव्हरच्या आत मृत झालेलं होतं. अशात डॉक्टरांनी सर्जरी करून मृत भ्रूण बाहेर काढलं. इतिहासात डोकावून पाहिलं तर जर्नल ऑफ इमरजन्सीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये एका महिलेच्या लिव्हरमधून १८ आठवड्यांचं भ्रूण अटॅच आढळलं होतं. या महिलेची सर्जरी करण्यात आली आणि यादरम्यान ब्लीडिंगमुळे महिलेचा मृत्यू झाला होता.