शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये 'बकेट बॉम्ब' हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 9:28 AM

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे.

ठळक मुद्देडिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला.

लंडन, दि. 16 - लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी  भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत 29 प्रवासी जखमी झाले. लंडन स्टेशनजवळील भुयारीमार्गातून जाणा-या एक भरगच्च ट्रेनमध्ये स्फोट घडवण्यात आला. यासाठी आयईडी स्फोटकांचा वापर करण्यात आला. यावर्षातील ब्रिटनमध्ये झालेला हा पाचवा दहशतवादी हल्ला आहे. 

हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले.

पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला