काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना घडली आहे. पूल कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला. लुआलाबा प्रांतातील कालांडो साइटवर ही धक्कादायक घटना घडली, जिथे दररोज मोठ्या संख्येने खाण कामगार येतात. काँगोची आर्टिसनल मायनिंग एजेंसी SAEMAPE ने सांगितलं की सुरुवातीचे आकडे जास्त आहेत. ४९ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी ३२ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. २० जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
एजन्सीच्या मते, घटनास्थळाचे रक्षण करणाऱ्या लष्करी कर्मचाऱ्यांच्या गोळीबाराचा आवाज ऐकून खाण कामगार घाबरले. घाबरलेले खाण कामगार एकाच वेळी एका अरुंद लाकडी पुलावर चढले, ज्यामुळे लोकांचं वजन सहन न झाल्याने लाकडी पूल कोसळला. खाण कामगार एकमेकांवर पडले. अनेकांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले. चेंगराचेंगरीची परिस्थिती देखील निर्माण झाली होती.
ह्युमन राईट्स प्रोटेक्शन इनिशिएटिव्हने या घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे, विशेषतः सैन्याच्या भूमिकेवर आणि गोळीबाराच्या वृत्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लुआलाबाचे प्रांतीय गृहमंत्री रॉय कौम्बा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि मृतांची संख्या निश्चित केली जात आहे.
काँगोमधील लाखो लोकांसाठी आर्टिसनल मायनिंग हा उपजीविकेचा एक प्रमुख सोर्स आहे, परंतु सुरक्षितता अत्यंत कमकुवत मानली जाते. अपुरी उपकरणं, आणि अस्थिर संरचनेमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतो. सुरक्षा तज्ञांचे म्हणणं आहे की, नियमांचं पालन न करणे आणि देखरेखीचा अभाव यामुळे कामगारांना सतत मृत्यूचा धोका असतो आणि पूल अपघात हे एक दुःखद उदाहरण आहे.
Web Summary : A bridge collapse at a copper mine in Congo's Lualaba province killed 32. A stampede occurred as miners fled gunfire, causing the bridge to fail. Rescue efforts are ongoing, and an investigation into the incident is underway, highlighting safety concerns in artisanal mining.
Web Summary : कांगो के लुअलाबा प्रांत में एक तांबे की खदान में पुल टूटने से 32 लोगों की मौत हो गई। गोलीबारी से भगदड़ मचने के कारण पुल ढह गया। बचाव कार्य जारी है, और घटना की जांच चल रही है, जो कारीगर खनन में सुरक्षा चिंताओं को उजागर करती है।