सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 18:13 IST2025-01-29T18:12:24+5:302025-01-29T18:13:27+5:30

आरोपांनंतर, संबंधित सावत्र आईला उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिली आहे. यानंतर आरोप कायम ठेवायचे की नाही, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. उत्तरानंतर जूरी प्रकरणाच्या ट्रायलसाठी जाईळ.

Brazil news Little girl trapped in stepmother's plan She drowned in washing machine, you were also shocked to know the plan | सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल

सावत्र आईच्या प्लॅनमध्ये अडकली चिमुकली? वॉशिंग मशीनमध्ये बुडून मृत्यू, प्लॅन जाणून तुम्हालाही धक्का बसेल

आई म्हणजे परमेश्वराचे रूप असते, असे मानले जाते. मात्र, एका आईवरच चिमुकलीची हत्या केल्याचा आरोप आहे. या सावत्र आईने चिमुकलीला मारण्यासाठी एक प्लॅन तयार केला आणि आणि तिची हत्या केली. असा आरोपो करण्यात आला आहे. ही घटना ब्राझीलमधून समोर आली आहे.

अशी केली चिमुकलीची हत्या -
ब्राझीलमध्ये एका सावत्र आईवर तिच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. मुलीला मारण्यासाठी तिने प्रथम तिची आवडती खेळणी वॉशिंग मशीनमध्ये टाकली. यानंतर, वॉशिंग मशीनसमोर एक प्लास्टिकचा स्टूल ठेवला, यानंतर मुलीला पाण्यात खेळण्यांशी खेळता यावे म्हणून बेंचवर बसवले. खेळत असताना, संबंधित चिमुकली पाण्याने भरलेल्या वॉशिंग मशीनमध्ये पडली. यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाला.

काय म्हणाले वकील? -
यासंदर्भात डॉस सँटोसचे वकील पावलो हारा ज्युनियर आणि सुलेन गुंडिम यांनी दावा केला आहे की, संबंधित घटना मोठी करून दाखवण्या आली आहे. हे घडले, ती एक 'दुर्घटना' होती. सावत्र आई आणि सावत्र मुलगी यांच्यात चांगले संबंध होते. आईला मुलीची हत्या करायची होती, असे दर्शवणारा कोणताही पुरावा नाही. दरम्यान, इसाबेलीची आई, अलेक्झांडर बेलनरचे वकील म्हणाले, "तिने घटना घडावी, यासाठी संपूर्ण परिस्थिती तयार केली होती. मशीन, स्टूल, तिने मोजे घातलेले होते, खेळणी पाण्यात ठेवण्यात आली होती."

तीन वर्षीय इसाबेली ओलिवेरा असुनकाओ आपल्या आईसोबत राहत होती. मात्र शुक्रवार आणि शनिवारी ती आपल्या वडिलांसोबत राहत होती आणि जेव्हा तो कामावर असायचा, तेव्हा तिला तिची सावत्र आई सुझाना डाजर डॉस सँटोसकडे सोडले जात होते.

आरोपांनंतर, संबंधित सावत्र आईला उत्तर देण्यासाठी १० दिवसांचा वेळ दिली आहे. यानंतर आरोप कायम ठेवायचे की नाही, यावर न्यायालय निर्णय घेणार आहे. उत्तरानंतर जूरी प्रकरणाच्या ट्रायलसाठी जाईळ.
 

Web Title: Brazil news Little girl trapped in stepmother's plan She drowned in washing machine, you were also shocked to know the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.