Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 23:11 IST2025-06-21T23:09:11+5:302025-06-21T23:11:55+5:30
उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या या हॉट एअर बलूनला आग लागली आणि तो प्रेया ग्रांडे शहरात कोसळला. दुर्घटनेत २१ प्रवाशांपैकी ८ जणांचा मृत्यू झाला.

Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात एक भयानक अपघात घडला आहे. स्थानिक आणि राज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कॅटरिना येथे २१ प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला, ज्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत.
राज्य अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या उड्डाणादरम्यान पर्यटकांच्या या हॉट एअर बलूनला आग लागली आणि तो प्रेया ग्रांडे शहरात कोसळला. दुर्घटनेत २१ प्रवाशांपैकी ८ जणांचा मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या १३ जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीही घडली आहे अशी घटना
ब्राझीलमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. गेल्या रविवारी, साओ पाउलो राज्यातही एक फुगा कोसळला होता, ज्यात २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि ११ जण जखमी झाले होते, असे 'जी१' वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
8 DEAD. And for what? A balloon ride. A selfie. A thrill. 🎈💔
— World Wire (@WorldWireX) June 21, 2025
A hot air balloon crashed in Brazil.
It was illegal.
No safety checks. No license. No shame.
People boarded it hoping for memories.
They got tragedy.
Adventure without responsibility is a crime — not tourism.
Stop… pic.twitter.com/SuEkxcdZRq
ब्राझीलमधील प्रेया ग्रांडे हे 'हॉट-एअर बलूनिंग'साठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. जून महिन्यात सेंट जॉनसारख्या कॅथोलिक संतांच्या उत्सवादरम्यान ब्राझीलच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये हा एक लोकप्रिय उपक्रम असतो. यासाठी लोक दूरदूरून येथे येतात.
अपघाताचा व्हिडिओ व्हायरल, सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह!
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर्यटकांची कोणतीही काळजी न घेता केलेल्या या कृतीवर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "कोणतीही काळजी न घेत असे साहस करणे हा गुन्हा आहे - पर्यटन नाही." यासोबतच, या अपघातामुळे ब्राझीलच्या सांता कॅटरिना अधिकाऱ्यांवरही टीका झाली आहे की, राज्यात सुरक्षा तपासणीशिवाय अशा कृती कशा केल्या जात आहेत. या घटनेने साहसी पर्यटनातील सुरक्षेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.