शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:03 IST

१० वर्षांपूर्वी सीरियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या अहमद अल अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता एका दहशतवाद्याला आव्हान दिलं.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील बॉन्डी बीचवर सर्व काही सामान्य होतं. यहूदी समुदायाचे लोक 'हनुक्का' हा उत्सव साजरा करत होते. बॉन्डी बीचवर संगीत, नृत्य आणि उत्साहाचं वातावरण होते. याच दरम्यान तिथे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमद अल अहमद आणि त्याचा चुलत भाऊ जॉजे अल्कांज हे दोघेही तिथे फिरत होते.

१० वर्षांपूर्वी सीरियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या अहमद अल अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता एका दहशतवाद्याला आव्हान दिलं आणि त्याच्यावर झेप घेऊन त्याची बंदूक हिसकावून घेतली. अल्कांजने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही फिरत-फिरत कार्सच्या मागे गेलो. तेव्हा गोळ्यांचे आवाज ऐकू आले. आम्ही पाहिलं की दोन लोक आमच्या खूप जवळ गोळीबार करत होते. अचानक झालेला गोळीबार पाहून आम्ही खूप घाबरलो होतो."

"माझ्या कुटुंबाची काळजी घ्या"

अहमद अल अहमद म्हणाला, "मी आता मरणार आहे, कृपया माझ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि त्यांना सांगा की मी लोकांचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलो." अहमद कार पार्कवरून बंदूकधाऱ्याच्या दिशेने पुढे सरकला. उभ्या असलेल्या कारच्या मागे लपून तो शूटरच्या शक्य तितका जवळ गेला. जसा तो जवळ पोहोचला, अहमदने त्या दहशतवाद्यावर झेप घेतली. त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेऊन त्याला खाली पाडलं.

अहमदला लागल्या दोन गोळ्या

बंदूकधारी जमिनीवर मागे पडला. अहमदने रायफल उचलली आणि त्याच्यावर नेम साधला.  याच दरम्यान अहमदला दोन गोळ्या लागल्या. सध्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. अहमदच्या वडिलांनी आपला मुलगा हिरो असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याची प्रकृती आता बरी असल्याचं देखील सांगितलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Hero: "Tell my family..." Ahmed disarms terrorist, saves lives.

Web Summary : In Sydney, a hero named Ahmed confronted a gunman during an attack, disarming him and saving lives. Shot twice, Ahmed is now stable. He asked to tell his family he acted to protect others. Sixteen died in the attack.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाFiringगोळीबारterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद