पाकिस्तानमध्ये चर्चजवळ बाँबस्फोट, १० ठार
By Admin | Updated: March 15, 2015 15:57 IST2015-03-15T15:55:17+5:302015-03-15T15:57:03+5:30
किस्तानमधील लाहोर येथे चर्चसमोर झालेल्या दोन बाँबस्फोटांमध्ये १० जण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

पाकिस्तानमध्ये चर्चजवळ बाँबस्फोट, १० ठार
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १५ - पाकिस्तानमधील लाहोर येथे चर्चसमोर झालेल्या दोन बाँबस्फोटांमध्ये १० जण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या स्फोटांमध्ये ५५ हून अधिक जण जखमी झाले असून तालिबानी संघटना जमातूल अहरारने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
लाहोरमधील ख्रिश्चनबहुल परिसरात दोन चर्च असून तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारी या चर्चला लक्ष्य केले. चर्चच्या बाहेर दोन दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बाँबस्फोटानंतर नाराज झालेल्या स्थानिकांनी दोन संशयितांना ठार मारल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. यामुळे घटनास्थळी अडकलेल्या अनेक नागरिकांची सुखरुप सुटका करणे शक्य झाले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बाँबस्फोटानंतर लाहोरमधील काही भागांमध्ये जातीय हिंसाचाराला सुरुवात झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.