पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:23 IST2025-10-03T14:22:11+5:302025-10-03T14:23:02+5:30
पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
पाकिस्तानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी पाकिस्तानातील पेशावर शहरात एक मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चार पोलिस गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पेशावर कॅपिटल सिटी पोलिस अधिकारी मियाँ सईद यांच्या कार्यालयातून ही माहिती मिळाली.
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली
स्फोटक पोलिसांच्या मोबाईल व्हॅनच्या मार्गावर ठेवण्यात आले होते, यामध्ये थेट पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. स्फोटानंतर मोठ्या संख्येने सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला. बॉम्ब निकामी पथके आणि फॉरेन्सिक पथके पुरावे गोळा करत आहेत.
क्वेटा शहरही हादरले
मंगळवार बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे मोठा स्फोट झाला त्यावेळी हा स्फोट झाला. ३० सप्टेंबर रोजी फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ झालेल्या स्फोटात किमान १० जण ठार आणि ३२ जण जखमी झाले. बलुचिस्तानचे आरोग्य मंत्री बख्त मोहम्मद काकर यांनी मृतांची संख्या दुजोरा दिला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये स्फोट इतका शक्तिशाली होता. यामुळे रस्त्यावर घबराट पसरली आणि जवळच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. क्वेटा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मॉडेल टाउनहून हाली रोडवर एक वाहन वळले तेव्हा हा स्फोट झाला.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचे वर्णन 'दहशतवादी हल्ला' असे केले. दहशतवाद्यांना योग्य उत्तर देण्यात येणार असयाचे सांगितले. सुरक्षा दलांनी जलदगतीने कारवाई करत चार दहशतवाद्यांना ठार केले.