शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
4
ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
5
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
6
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
8
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
9
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."
10
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
11
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
12
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
13
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
14
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
15
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
16
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
17
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
18
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
19
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
20
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

अमेरिकेत हिमवादळाचा कहर, जनजीवन गारठले

By admin | Updated: February 17, 2016 02:52 IST

अमेरिकेतील अनेक राज्यांत हिमवादळाचा जबर तडाखा बसला असून थंडीच्या कडाक्याने जनजीवन गारठले आहे. वादळासोबत पाऊसही कोसळत असल्याने पुराचा धोकाही वाढला आहे.

वॉशिंग्टन/न्यूयॉर्क : अमेरिकेतील अनेक राज्यांत हिमवादळाचा जबर तडाखा बसला असून थंडीच्या कडाक्याने जनजीवन गारठले आहे. वादळासोबत पाऊसही कोसळत असल्याने पुराचा धोकाही वाढला आहे. जवळपास १७ राज्यांना हिमवादळाने विळखा घातला असून काही नद्याही थंडीमुळे गोठल्या आहेत. विमानसेवेसह रस्त्यांवरील वाहतूक ठप्प पडली असून वादळाच्या फटक्याने पूर्व किनारपट्टी ते दक्षिण किनारपट्टीत झाडे आडवी झाली आहेत. घरांच्या छतावर तसेच अंगणासह आसपासच्या भागात दोन ते चार इंच बर्फाची थप्पी साचल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. घराबाहेर आणि रस्त्यांवर उभ्या असलेल्या कार बर्फाच्या ढिगाऱ्यात गडप झाल्या आहेत.जॉर्जिया ते मेन, मिसिसिपी, अल्बामा, फ्लोरिडा पॅनहॅण्डल, नॉर्थ कॅरोलिना, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पेनसिल्व्हानियासह १७ राज्यांतील शहरांनी बर्फाची चादरच पांघरल्याचे दृश्य दिसते. अनेक महत्त्वाच्या विमानतळांवरील दृश्यमानताही धूसर झाल्याने जवळपास १६०० विमान उड्डाणे रद्द करावी लागली.ल्युसियाना ते अल्बामापर्यंत हिमवादळाने विळखा घातला आहे. गारांसोबत जोरदार वारेही वाहत असल्याने अमेरिकेतील उत्तर ते दक्षिण भागातील जनजीवन जाम गारठले आहे. सोमवारी ‘प्रेसिडेन्ट डे’मुळे सुटी असल्याने शाळा आणि कार्यालये बंद असल्याने या लहरी हवामानाचा जनजीवनाला जास्त फटका बसला नाही. व्हर्जियाना, केंटुकी, वेस्ट व्हर्जियाना आणि मेरीलँड येथे जागोजागी बर्फाचे ढिगारे साचले असून अनेक ठिकाणचे तापमान शून्याखाली आले आहे. (वृत्तसंस्था)