पती बेपत्ता झाल्याचं समजून हृष्टीहीन महिलेने पोलिसांना केला फोन, मृतदेह घरातच बेडवर पडून होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 18:42 IST2022-01-01T18:42:15+5:302022-01-01T18:42:48+5:30
सूचना मिळताच पोलीस बुधवारी सायंकाळी ६ वाजता कपलच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना समोर जे दिसलं ते बघून धक्का बसला.

पती बेपत्ता झाल्याचं समजून हृष्टीहीन महिलेने पोलिसांना केला फोन, मृतदेह घरातच बेडवर पडून होता
ब्रिटनमधील पोलीस एका अशा केसची चौकशी करत आहेत, ज्यात ७६ वर्षीय एका दृष्टीहीन महिलेने पोलिसांना सांगितलं होतं की, तिचा पती बेपत्ता आहे. पण तिचा पती बेडवर मृतावस्थेत आढळून आला होता.
Daily Star च्या वृत्तानुसार, विलियम रॉबर्ट लॅंग ज्यूनिअरच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, मंगळवारी दुपारपासून तिचा पती काहीच बोलत नाहीये. तिने पोलिसांना सांगितलं की, ही अजब बाब आहे. याआधी असं कधीच झालं नाही.
ही सूचना मिळताच पोलीस बुधवारी सायंकाळी ६ वाजता कपलच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना समोर जे दिसलं ते बघून धक्का बसला. महिलेच्या पतीचा मृतदेह बेडवर पडलेला होता आणि त्याच्यावर गोळ्या झाडण्या आल्या होत्या.
पोलीस आता याचा तपास करत आहेत की, तिच्या पतीवर इतक्या गोळ्या झाडण्यात आल्या, पण तिला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस याप्रकरणी पोस्टमार्टम रिपोर्टची वाट बघत आहेत.
आता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, हृष्टीहीन महिलेच्या पतीची हत्या का आणि कुणी केली. पोलीस या केसचा गंभीरतेने तपास करत आहेत. त्या प्रत्येक शक्यतेचा विचार करत आहे ज्याने हत्या करणारे सापडतील.