शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

ब्लाटरची अमेरिका व युरोपवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2015 01:31 IST

फिफाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाल्यानंतर सॅप ब्लाटर यांनी अमेरिका व युरोपवर टीकास्त्र सोडले.

ज्युरिच : फिफाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा निवड झाल्यानंतर सॅप ब्लाटर यांनी अमेरिका व युरोपवर टीकास्त्र सोडले. ब्लाटर म्हणाले, ‘फुटबॉलच्या जागतिक संस्थेला लक्ष्य करण्याच्या अमेरिकेच्या न्यायपालिकेमुळे स्तब्ध झालो.’ या व्यतिरिक्त युरोपीयन फुटबॉलच्या अधिकाऱ्यांच्या विरोध मोहिमेवरही टीका केली. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी प्रतिस्पर्धी प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी माघार घेतल्यामुळे ब्लाटर यांची पाचव्यांदा फिफाच्या अध्यक्षपदी निवड झाली. स्विस दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत ब्लाटर म्हणाले, ‘बुधवारी अमेरिकन भ्रष्टाचारविरोधी पकड वॉरंटच्या आधारावर फिफाच्या अधिकाऱ्यांना झालेली अटक म्हणजे काँग्रेसमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होता.’ शुक्रवारी फिफा काँग्रेसने ब्लाटर यांची नव्या कार्यकाळासाठी पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड केली. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अटकसत्रावर प्रतिक्रिया देताना ब्लाटर म्हणाले, ‘मला खात्री नसली तरी यात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आहे.’ ब्लाटर यांनी अमेरिकी अ‍ॅटर्नी जनरल लोरेटा लिंचसह अमेरिकन न्यायपालिकेने फिफावर केलेल्या टीकेचा त्यांनी निषेध केला. २०२६ च्या विश्वकप यजमानपदाचा दावा करण्याची युरोपियन देशांना संधी : ब्लाटरज्युरिच : युरोपियन फुटबॉल संघटनांच्या विरोधानंतरही सलग पाचव्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदी निवड झालेले सॅप ब्लाटर यांनी २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या यजमानपदासाठी दावा करण्याची युरोपियन देशांना संधी असल्याचे म्हटले आहे.युरोप व्यतिरिक्त न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया यांच्या विरोधानंतरही पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान झालेले ब्लाटर म्हणाले, ‘२०२६ मध्ये होणाऱ्या विश्वकप स्पर्धेसाठी आशियाई देश वगळता अन्य सर्व खंडातील देशांना यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याची संधी असल्याचा निर्णय कार्यकारी समितीने घेतला आहे. ब्लाटर यांनी या महिन्याच्या सुरुवातीला काही नियमांमध्ये बदल करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. त्यानुसार एकाच खंडात सलग दोनदा स्पर्धा आयोजित करता येणार नाही, या नियमाचा समावेश होता.