शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकबॉक्ससाठी आठवडा लागणार

By admin | Updated: January 2, 2015 02:25 IST

एअर एशियाच्या जलसमाधी मिळालेल्या जेट विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यास अपघातग्रस्त विमानात अखेरच्या क्षणी काय घडले यावर प्रकाश पडू शकतो;

जकार्ता/सिंगापूर : एअर एशियाच्या जलसमाधी मिळालेल्या जेट विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडल्यास अपघातग्रस्त विमानात अखेरच्या क्षणी काय घडले यावर प्रकाश पडू शकतो; पण हा बॉक्स हाती लागण्यास आठवडा जाऊ शकतो, असे इंडोनेशियाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. जावा समुद्रात विमानाचे अवशेष विखुरलेले असून, मृतदेह पाण्यावर तरंगत आहेत. हे अवशेष व मृतदेह वर काढण्यासाठी शोध पथकाची मोहीम सुरू आहे. पांगकलान बन परिसरातील हवामानात अजूनही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे समुद्रात पडलेल्या ए३२०-२०० विमानाचे अवशेष व विमानातील १६२ लोकांचे मृतदेह मिळविणे ही कसोटी आहे. विमानातील फ्लाईट रेकॉर्डर वा ब्लॅकबॉक्स मिळण्यास समुद्र शांत असेल तर आठवडा जावा लागेल, असे इंडोनेशियाच्या वाहतूक सुरक्षा केंद्राचे प्रमुख अँटोनियस टूस सँतियोसो यांनी म्हटले आहे. जावा समुद्रात गुरुवारी स्वच्छ ऊन पसरले होते. त्यामुळे अवशेष व मृतदेह आज हाती लागण्याची शक्यता आहे. विमानाच्या फ्युजलेजमध्ये मृतदेह अडकले असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे विमानाच्या फ्युजलेजचा भाग शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. पाण्याखाली काम करणारी सिंगापूरची उपकरणे समुद्र तळाचा शोध घेत आहेत. या उपकरणांना सोनर यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे सागर तळीच्या वस्तूंची छायाचित्रे पडद्यावर दिसू शकतात.च्रविवारी सकाळी एअर एशियाचे फ्लाईट क्र. क्यूझेड ८५०१ हे सिंगापूरला जाणारे जेट विमान गायब झाले होते. या विमानाचे अवशेष मिळण्यास हवामानाचे अडसर निर्माण झाले होते. च्गुरुवारी समुद्र थोडा शांत असल्याने मृतदेह वर काढले जाण्याची शक्यता होती; पण दुपारनंतर वातावरण बदलले असून, हेलिकॉप्टरवर मुसळधार पाऊस आदळत आहे. जहाजे अशा वातावरणातही कार्यरत आहेत.