‘ब्लॅक पँथर’चा अभिनेता शाडविक बोसमनचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T04:59:33+5:302020-08-30T05:00:36+5:30

या अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून त्याच्या निधनाची माहिती देताना म्हटले आहे की, त्याला २०१६ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्याच्या अंतिम क्षणी त्याची पत्नी व कुटुंबीय त्याच्यासमवेत होते.

Black Panther actor Shadwick Bosman dies | ‘ब्लॅक पँथर’चा अभिनेता शाडविक बोसमनचे निधन

‘ब्लॅक पँथर’चा अभिनेता शाडविक बोसमनचे निधन

लॉस एंजेलिस : ‘ब्लॅक पँथर’चा दिग्गज अभिनेता शाडविक बोसमनचे (४३) कर्करोगाने निधन झाले आणि त्याचे जगभरातील चाहते शोकसागरात बुडाले. हॉलीवूडसह बॉलीवूडमधील करिना कपूर, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, रणवीर सिंगसह अनेकांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, अनुपम खेर, संजना, रितेश देशमुख आदींनी बोसमनला श्रद्धांजली वाहताना हृदयस्पर्शी संदेश दिलेले आहेत.
चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या अभिनेत्याच्या कुटुंबाने अधिकृत टिष्ट्वटर हँडलवरून त्याच्या निधनाची माहिती देताना म्हटले आहे की, त्याला २०१६ मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्याच्या अंतिम क्षणी त्याची पत्नी व कुटुंबीय त्याच्यासमवेत होते. मार्शल ते ५ ब्लडस, अशा अनेक चित्रपटांचे त्याने विविध शस्त्रक्रिया व किमोथेरपी सुरू असताना चित्रण केले होते.
 
बोसमन एक चांगला अभिनेता तर होताच. तो खळखळत्या हास्याचा झरा होता. -अनुपम खेर
तुझी अद्भुत स्मरणचित्रे मला व माझ्या मुलांना दिलीस. तू आमच्या हृदयात कायम राहशील.
-रितेश देशमुख
तुझी गाणी, चित्रपट यात आम्ही अक्षरश: रममाण होतो. मग त्यातच तुझी भेट झाली. त्यावेळी लक्षात आले की, पडद्यावरचा हीरो अतिशय नम्र व्यक्ती आहे.
-जेनेलिया देशमुख

Web Title: Black Panther actor Shadwick Bosman dies