शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

एच-१बी व्हिसा रद्द करण्यासाठीचे विधेयक अमेरिकी संसदेत सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:43 IST

H-1B visa: एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

न्यूयॉर्क : एच-१ व्हिसा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अमेरिकेच्या एका खासदाराकडून संसदेत विधेयक सादर करण्यात येणार आहे. या व्हिसामुळे मिळणारे अमेरिकन नागरिकत्व रद्द करणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. हे विधेयक पारित झाल्यास एच-१बी व्हिसा संपल्यानंतर भारतीय नागरिक तसेच बाहेर देशातून येणाऱ्या लाखो लोकांना त्यांच्या मायदेशी परतावे लागणार आहे. जॉर्जियाचे खासदार मार्जरी टेलर ग्रीन हे संबंधित विधेयक संसदेत मांडणार आहेत. त्यांनी स्वत: शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. 

माझ्या प्रिय अमेरिकन मित्रांनो, एच-१ बी व्हिसा पूर्णपणे रद्द केला जावा यासाठी मी संसदेत एक विधेयक सादर करणार आहे. एच-१ बी व्हिसा या कार्यक्रमामुळे बऱ्याच काळापासून फसवणूक व गैरवापर होत आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून अमेरिकन कामगारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागत असल्याचे सोशल मीडियाद्वारे खा. मार्जरी टेलर ग्रीन यांनी स्पष्ट केले. 

१० हजार व्हिसाची मर्यादा अमेरिकन लोकांना जीवनरक्षक सेवा देणाऱ्या डॉक्टर व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी दरवर्षी १०,००० व्हिसाची मर्यादा निश्चित करण्याची सूट दिली आहे. मात्र, ही मर्यादादेखील दहा वर्षांनंतर पूर्णपणे रद्द करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.अमेरिकेच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील विद्यार्थ्यांसाठी जागा वाढवणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. बाहेर देशातील लोकांनी कायमस्वरूपी अमेरिकेत राहण्यासाठी नाही तर विशिष्ट कालावधीसाठी लागणाऱ्या तज्ज्ञांची गरज पूर्ण करण्यासाठी हा व्हिसा सुरू करण्यात आला होता, असा दावा खासदार टेलर ग्रीन केला. 

...तर भारतीयांना सर्वाधिक फटकाअमेरिकन संसदेत हे विधेयक पारित झाल्यास भारतीय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. अमेरिकेत प्रत्येक वर्षी ६५ हजार नियमित, तर उच्च पदवी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २० हजार एच-१ व्हिसा दिले जातात.भारतीय आयटी क्षेत्रातील व्यावसायिक या व्हिसा श्रेणीत सर्वाधिक आहेत. त्यामुळे संबंधित विधेयक पारित झाल्यास एच-१ बी व्हिसावर अमेरिकेत राहणारे भारतीय व्यावसायिक विशेषकरून आयटी क्षेत्रातील कर्मचारी व डॉक्टरांना सर्वाधिक फटका बसणार आहे. या विधेयकामुळे एच-१ बी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा मार्गदेखील बंद होणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : US Lawmaker to Introduce Bill to End H-1B Visa Program

Web Summary : An American lawmaker plans to introduce a bill to eliminate the H-1B visa, potentially impacting thousands of Indian IT professionals and doctors by ending a path to citizenship and forcing many to return home.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका