शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

फेसबुकवर सर्वात मोठा सायबर हल्ला; 5 कोटी युजर्सची माहिती चोरली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:49 PM

फेसबुकला आठवड्याच्या सुरुवातीलाच या सायबर हल्ल्याची माहिती मिळाली. फेसबुकच्या कोडमध्ये बदल करून वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे.

सॅन फ्रान्सिस्को : सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या नेटवर्किंग साईट फेसबुकच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये जवळपास 5 कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याची शक्यता आहे. फेसबुकनेच शुक्रवारी ही माहिती दिली आहे. फेसबुकला आठवड्याच्या सुरुवातीलाच या सायबर हल्ल्याची माहिती मिळाली. फेसबुकच्या कोडमध्ये बदल करून वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे. फेसबुकने या प्रकरणी अंमलबजावणी अधिकाऱ्यांना याची तक्रार दिली आहे. तसेच या कोडमध्ये दुरुस्ती केली आहे. फेसबुकने या हल्ल्यापासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी 9 कोटी युजर्सना बळजबरीने लॉगआऊट करण्यास भाग पाडले. हा हल्ला कोठून झाला याबाबत फेसबुकला अद्याप शोध लावता आलेला नसून हल्ल्याची व्याप्तीही समजलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जगभरातल्या जवळपास 5 कोटी युजर्सना याचा फटका बसला आहे, परंतु देशागणिक आकडेवारी उपलब्ध नसल्याचे फेसबुकने आयर्लंडमधील डेटा नियामक संस्थेला माहिती दिली आहे. कंपनीने युजर्सना लॉग आऊट करून पुन्हा लॉग इन करण्यात सांगितले आहे. तसेच युजर्सनं पासवर्ड बदलण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाचा आमच्याकडून तपास सुरू आहे. हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटची माहिती चोरली का, त्याचा गैरवापर झाला का, याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असं कंपनीनं म्हणणं आहे. आमच्यासाठी युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे जे घडलं त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत, असं म्हणत फेसबुकनं युजर्सची माफी मागितली आहे. 

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम