शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

प्रदूषणाचे सर्वाधिक मृत्यू भारतात!, हवेचे प्रदूषण हे सर्वात मोठे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:41 AM

सन २०१५ मध्ये प्रदूषणामुळे जगात झालेल्या ९० लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ लाख मृत्यू भारतात झाल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणीत काढण्यात आला आहे.

लंडन : सन २०१५ मध्ये प्रदूषणामुळे जगात झालेल्या ९० लाख मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे २५ लाख मृत्यू भारतात झाल्याचा निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय अभ्यास पाहणीत काढण्यात आला आहे.‘लॅन्सेट’ या विख्यात वैज्ञानिक नियतकालिकाने प्रदूषणामुळे आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील ४० तज्ज्ञांचा आयोग नेमला. आयोगाच्या अहवालात हा निष्कर्ष काढला आहे. पर्यावरणविषयक वैज्ञानिक फिलिप लॅन्ड्रीग्रान या अभ्यासकांच्या चमूचे प्रमुख होते. हा अहवाल ‘लॅन्सेट’च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.अहवालानुसार जगभरात प्रदूषणामुळे सर्वाधिक म्हणजे २८ टक्के मृत्यू भारतात होतात. १८ लाख मृत्यू झालेल्या चीनचा याबाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो.सर्व प्रकारच्या प्रदूषणांमध्ये हवेचे प्रदूषण अकाली मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. पाहणी केलेल्या वर्षात प्रदूषणाशी संबंधित ९० लाख मृत्यूंपैकी ६५ लाख मृत्यू हवेच्या प्रदूषणाने झाल्याचे दिसते. जगातील १० देशांपैकीभारतात प्रदूषणाने होणा-या मृत्यूंमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसून आले. हवेच्या प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हवेतील धूळ व कार्बन कणांच्या मोठ्या प्रमाणामुळे झाले होते. भारताच्या अनेक शहरांमध्ये हवेतील या तरंगत्या कणांचे प्रमाण वर्षभर सरासरी प्रमाणाहून ५० टक्क्यांहून जास्त आढळून आले.तुलनेने पाण्याचे प्रदूषण हे कमी मृत्यूंना कारणीभूत ठरले. त्या वर्षी भारतात ६४ हजार, तर चीनमध्ये ३४ हजार लोक पाण्याच्या प्रदूषणामुळे दगावले होते. जगभरातील अकाली मृत्यूंपैकी १६ टक्के मृत्यूंचे मूळ प्रदूषणाशी निगडित असल्याचे अभ्यासातूून दिसले. भारतात हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २५ टक्के एवढे जास्त होते. असे ९२ टक्के मृत्यू अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाले. त्यातही अल्पसंख्य समाज व गरीब व विशेषत: लहान मुले प्रदूषणाला अधिक बळी पडत असल्याचाही निष्कर्ष या अभ्यासकांनी काढला.एड््स, क्षयरोग व मलेरिया या तिन्हींनी मिळून होणा-या मृत्यूपेक्षा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंचे प्रमाण तिपटीने अधिक आहे. चुकीचा आहार, अतिस्थूलपणा, अतिमद्यसेवन, रस्ते अपघात तसेच माता व बालकांचे कुपोषण यामुळे होणा-या मृत्यूंहूनही प्रदूषण मृत्यू अधिक असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. (वृत्तसंस्था)

भारतातील मृत्यूंची वर्गवारीहवेचे प्रदूषण १८ लाख १० हजारपाण्याचे प्रदूषण ५ लाखसार्वजनिक अस्वच्छता ३.२० लाखप्रदूषणामुळे होणारे रोगश्वसनसंस्थेचे रोग - 51%फुप्फुसाचा कर्करोग- 41%इस्चेमिक हार्ट डीसीज- 27%मेंदूचा स्ट्रोक- 23%कार्डिओव्हॅस्क्युलर - 21%

टॅग्स :pollutionप्रदूषण