मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 18:57 IST2024-11-18T18:56:38+5:302024-11-18T18:57:27+5:30
Anmol Bishnoi Arrested: अनमोल बिश्नोई हा सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी आहे.

मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
सलमान खानवर हल्ला करणाऱ्या लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. अनमोल बिश्नोईला कॅलिफोर्नियातून ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल हा आपल्या देशात असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव अमेरिकेला पाठविला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने स्पेशल मकोका कोर्टात याचिका दाखल केली होती. यात अनमोल बिश्नोईची प्रत्यार्पण प्रक्रिया सुरु करण्याचे म्हटले होते.
अनमोल बिश्नोई हा सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी आहे. त्याच्यावर अन्य गुन्हेही नोंद आहेत. अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्यास एनआयएने १० लाखांचा इनाम घोषित केला होता. एनआयएने देखील २०२२ मध्ये दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांत आरोप पत्र दाखल केले आहे.