रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:23 IST2026-04-04T12:21:03+5:302026-04-04T12:23:50+5:30

America Iran War: सौदीतील अमेरिकन दूतावासावरील हल्ला किरकोळ असून, छोटी आग लागल्याचा दावा केला होता. परंतु, आता तीन मजली इमारतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

big setback to america saudi arabia embassy destroyed by iran attack donald trump never even thought about it | रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही

रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही

America Iran War: अमेरिका इस्रायल इराण युद्धात वार-पलटवार यांचा सिलसिला सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. इस्रायल, अमेरिका इराणच्या अनेक भागांत जोरदार क्षेपणास्त्र डागत असून, इराणही आखाती देशातील अमेरिकेच्या ठिकाणांवर प्रतिहल्ला करत जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन ते तीन आठवड्यात युद्ध संपेल, असा दावा केला असला, तरी या युद्धाची तीव्रता वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. यातच मध्यरात्री दीड वाजता इराणने सौदी अरेबियामधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला केला. 

इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा तणाव आता नव्या पातळीवर पोहोचला आहे. इराणने सौदीतील दूतावासाचे अमेरिकेच्या अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर नुकसान केले आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील आधीच अस्तित्वात असलेला तणाव आणखी वाढला आहे. या संपूर्ण घटनेबाबत WSJ रिपोर्टमधून माहिती समोर आली आहे. ३ मार्च रोजी सौदी अरेबियातील अमेरिकी दूतावासावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे खूप जास्त विध्वंस झाला. हा हल्ला पहाटे सुमारे १.३० वाजता झाला, जेव्हा दोन इराणी ड्रोन दूतावासाच्या सर्वांत सुरक्षित मानल्या गेलेल्या भागातच डागले गेले. हे लक्ष्य एकदम अचूक होते. यामुळे या ठिकाणी अनेक तास मोठी आग धुमसत राहिली. 

दूतावासाचे काही भाग आता दुरुस्त करणेही शक्य नाही

या हल्ल्यामुळे सीआयए स्टेशनसह तीन मजली इमारतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांच्या मते, दूतावासाचे काही भाग आता दुरुस्त करणेही शक्य नाही. हा हल्ला रात्रीच्या वेळी झाला, त्यामुळे कमी लोक उपस्थित होते. दिवसाढवळ्या इतका भयंकर हल्ला झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती. कारण याच इमारतीत शेकडो कर्मचारी काम करतात. 

दरम्यान, सुरुवातीला हा हल्ला किरकोळ असून, एक छोटी आग लागल्याचे सांगितले गेले होते. परंतु, आता येत असलेली तपशीलवार माहिती एक पूर्णपणे वेगळेच चित्र समोर उभे करत आहे. मध्य पूर्वेतील विविध भागांमधील अनेक अमेरिकी दूतावास आणि मिशनना अशाच प्रकारे लक्ष्य करण्यात आले आहे. इराणकडून वाढणारा हा धोका अमेरिकेसाठी एक मोठी चिंतेची बाब बनल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title : ईरान ने सऊदी में अमेरिकी दूतावास पर हमला किया; अमेरिका को उम्मीद नहीं थी।

Web Summary : ईरान ने सऊदी अरब में अमेरिकी दूतावास पर ड्रोन से हमला किया, जिससे भारी नुकसान हुआ। रात में हुए इस हमले ने एक सुरक्षित क्षेत्र को निशाना बनाया, जिससे बढ़ते तनाव और मध्य पूर्व में अमेरिकी मिशनों की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।

Web Title : Iran strikes US embassy in Saudi; America didn't anticipate.

Web Summary : Iran attacked the US embassy in Saudi Arabia with drones, causing significant damage. The attack, which occurred at night, targeted a secure area, raising concerns about escalating tensions and the safety of US missions in the Middle East.