शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

पाचऐवजी साडेचार दिवस करावे लागणार काम, UAE सरकारने कामाचा आठवडा केला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 6:29 PM

साडेचार दिवसांचा आठवडा करणारा UAE जगातील पहिलाच देश आहे.

दुबई: संयुक्त अरब अमिरात(UAE)ने आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट देणार आहे. UAE मध्ये 1 जानेवारी 2022 पासून आठवड्यात फक्त साडेचार दिवस काम होणार आहे. उर्वरित अडीच दिवस कर्मचाऱ्यांना सुटी मिळणार आहे. यूएई सरकारने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. 

येत्या काही दिवसांत हे सरकारी परिपत्रक सर्व सरकारी कार्यालयांना पाठवले जाणार आहे. साप्ताहिक कामकाजाचे तास कमी करणारा UAE हा जगातील पहिला देश आहे. जगातील बहुतेक देशांमध्ये पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा संस्कृती आहे. 1971 ते 1999 पर्यंत देशात आठवड्यातून 6 दिवस काम होते. 1999 मध्ये ते पाच दिवस आणि आता साडेचार दिवस करण्यात आले आहे.

खासगी क्षेत्रालाही नियम लागू होण्याची शक्यता

UAE तील वृत्तपत्र 'द नॅशनल'मधील बातमीनुसार, 1 जानेवारी 2022 पासून नवीन वर्किंग कॅलेंडर लागू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हा नवीन नियम सध्या फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. पण, येणाऱ्या काळात याच नियमांच्या आधारे देशातील खाजगी क्षेत्र देखील अशीच पावले उचलेल असा विश्वास आहे.

शुक्रवारी फक्त अर्धा दिवस काम

या नवीन नियमाननंतर शुक्रवारी फक्त अर्धा दिवस काम असेल. तसेच, शनिवार आणि रविवारी पूर्ण सुट्टी असेल. आदेशानुसार, जर कर्मचाऱ्यांना शुक्रवारी घरून काम करायचे असेल, तर त्यांना त्याची मंजुरी घ्यावी लागेल. सरकारच्या या घोषणेने दुबई आणि अबुधाबीमधील कर्मचारी खूप खूश आहेत. 

शाळा-कॉलेजसाठीही नियम

रिपोर्टनुसार लवकरच देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये देखील या नवीन नियमाचे पालन करतील. या संदर्भात स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाऊ शकते. मात्र, शाळा आणि खासगी क्षेत्राबाबत अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली नाहीत. कंपन्या स्वत: निर्णय घेतील.

उत्पादकता वाढवण्यावर भरUAE सरकारच्या अधिकृत मीडिया सेलने सांगितले की, जर आम्ही आमच्या कर्मचार्‍यांना कामाच्या बदल्यात समान विश्रांती दिली तर त्यांची उत्पादकता वाढू शकेल. याचा फायदा देशालाच होणार आहे. UAE ने शेवटचा 2006 मध्ये कामकाजाच्या आठवड्याचा पॅटर्न बदलला होता. त्यानंतर गुरुवार-शुक्रवारऐवजी शुक्रवार-शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती