भारताविरुद्ध मोठा कट; पाकिस्तानने 250 किलो RDX आणि 100 AK47 बांग्लादेशात पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:43 IST2024-12-27T16:40:07+5:302024-12-27T16:43:31+5:30

याचा वापर भारताविरुद्ध होऊ शकतो, असे दावा केला जातोय.

Big conspiracy against India; Pakistan sent 250 kg RDX and 100 AK47 to Bangladesh | भारताविरुद्ध मोठा कट; पाकिस्तानने 250 किलो RDX आणि 100 AK47 बांग्लादेशात पाठवले

भारताविरुद्ध मोठा कट; पाकिस्तानने 250 किलो RDX आणि 100 AK47 बांग्लादेशात पाठवले

Bangladesh News : बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर भारताविरोधात कारवाया वाढत आहेत. विशेष म्हणजे, एकेकाळी बांग्लादेशात नरसंहार घडवणारा पाकिस्तान, आज त्याचा जवळचा मित्र बनला आहे. दोन्ही देशांनी मिळून भारताविरोधात कट रचायला सुरुवात केली आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमुळे भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत. 

नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने जहाजाद्वारे मोठ्या प्रमाणात RDX आणि AK47 शस्त्रे बांग्लादेशला पाठवली आहेत. कराची बंदरापासून पाकिस्तानी मालवाहू जहाज MV अल बखेरा (ज्यामध्ये सुमारे 250 किलो RDX आणि 100 पेक्षा जास्त AK47 आणि दारूगोळा लपविला होता) ढाका बंदरात नेले जाते होते. पण, काही कारणास्तव चांदपूर बंदरावर गेण्यात आले. भारतीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जहाजात 720 टन गुरांचे अन्न आणि भाजीपाल्यासह मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि शस्त्रास्त्रे लपवण्यात आली होती. 

Web Title: Big conspiracy against India; Pakistan sent 250 kg RDX and 100 AK47 to Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.