मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 03:02 PM2024-02-22T15:02:05+5:302024-02-22T15:03:03+5:30

डेटा लीक झाल्याचे सर्वप्रथम तैवानचे संशोधक अजाका यांना समजले होते. त्यांनीच भारत सरकारला याची सूचना दिली आहे.

Big claim! Chinese Hackers Steal PMO's Data; Attacks on EPFO, Reliance, Air India, apollo Hospital... |  मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

 मोठा दावा! चिनी हॅकर्सनी पीएमओचा डेटा चोरला; ईपीएफओ, रिलायन्स, एअर इंडियावरही हल्ले...

चीनच्या एका हॅकर ग्रुपने मोठा दावा केला आहे. या ग्रुपने पंतप्रधान कार्यालय, रिलायन्स आणइ एअर इंडिया सारख्या मोठ्या कंपन्या, कार्यालयांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. यामध्ये पीएमओतील महत्वाचे सीक्रेट डॉक्युमेंट्स हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. 

इंडिया टुडेने याचे वृत्त दिले आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या (एमपीएस) कथित सायबर सुरक्षा कंत्राटदार iSoon शी संबंधित हजारो दस्तऐवज, फोटो, चॅट गीटहबवर पोस्ट करण्यात आले होते. iSoon आणि चिनी पोलिसांनी फाइल्स कशा लीक झाल्या हे शोधण्यासाठी तपास सुरू केला असल्याचे कॉन्ट्रॅक्टरच्या दोन कर्मचाऱ्यांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितले आहे. 

लीक झालेल्या डेटामध्ये अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रपतींचे अंतर्गत मंत्रालय यासारख्या भारतीय टार्गेटचा उल्लेख आहे. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ, बीएसएनएल, रिलायन्स अपोलो हॉस्पिटल यांच्यासह एअर इंडियाच्या प्रवाशांच्या दैनंदिन चेक-इन तपशीलांशी संबंधित डेटा हॅकर्सच्या हाती लागल्याचे समोर येत आहे. 

GitHub वर डेटा लीक झाल्याचे सर्वप्रथम तैवानचे संशोधक अजाका यांना समजले होते. त्यांनीच भारत सरकारला याची सूचना दिली आहे. यामध्ये अपोलो हॉस्पिटलसह भारतातील काही संस्था, 2020 मध्ये देशात येणारे आणि बाहेरून येणारे लोक, पंतप्रधान कार्यालय आणि लोकसंख्येच्या नोंदींचा समावेश आहे, असे ते म्हणाले आहेत. 

Web Title: Big claim! Chinese Hackers Steal PMO's Data; Attacks on EPFO, Reliance, Air India, apollo Hospital...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.