‘कोरोनाबाबतचा भारताचा प्रस्ताव न स्वीकारण्याची बायडेन यांच्याकडे मागणी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:19 IST2021-03-07T06:18:52+5:302021-03-07T06:19:24+5:30
इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. जगात कोरोनाची पहिली लाट आली त्या वेळेसही इटलीमध्ये या संसर्गाने मोठा हाहाकार माजविला होता.

‘कोरोनाबाबतचा भारताचा प्रस्ताव न स्वीकारण्याची बायडेन यांच्याकडे मागणी’
वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाशी संबंधित कोणत्याही संशोधनाचे बौद्धिक संपदा हक्क सर्वांनीच सोडून द्यावेत अशा आशयाचा प्रस्ताव भारत, दक्षिण आफ्रिकेसह आणखी काही देश जागतिक व्यापार संघटनेला सादर करणार आहेत. हा प्रस्ताव अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वीकारू नये, अशी मागणी त्या देशातील रिपब्लिकन पक्षाच्या चार सिनेटरनी केली आहे.
माईक ली, टॉम कॉटन, जोनी एर्नस्ट, टॉड यंग अशी या सिनेटरची नावे आहेत. त्यांनी बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेने स्वीकारला तर त्यामुळे कोरोना संसर्गासंदर्भातील नव्या लसी तसेच औषधांसाठी होणाऱ्या संशोधनाला खीळ बसेल. या चार सिनेटरनी म्हटले आहे की, प्रस्ताव मंजूर झाल्यास अमेरिकी कंपन्यांनी आजवर कोरोनावरील औषध संशोधनासाठी जी मेहनत घेतली ती वाया जाईल. केवळ उत्पादननिर्मिती कंपन्यांना महत्त्व प्राप्त होईल. नव्या कोरोना लसीचे काम अशा प्रस्तावामुळे बंद पडण्याचीही शक्यता आहे.
लसपुरवठ्यावर परिणाम होणार?
भारत, दक्षिण आफ्रिकेसह काही देशांनी सादर केलेला प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेत मंजूर झाला तर त्यामुळे कोरोना लसींच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे, असेही रिपब्लिकन पक्षाच्या चार सिनेटरनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जगभरात कोरोनातून बरे झाले सव्वानऊ कोटी
जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ११ कोटी ६७ लाख असून, त्यातील ९ कोटी २३ लाख जण बरे झाले व २५ लाख ९२ हजार लोकांचा बळी गेला. जगभरात २ कोटी १८ लाख रुग्ण.
इटलीत ३० लाख रुग्ण
इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. जगात कोरोनाची पहिली लाट आली त्या वेळेसही इटलीमध्ये या संसर्गाने मोठा हाहाकार माजविला होता.
भारतात रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ८७ लाख रुग्ण व २ लाख ६२ हजार बळी गेले आहेत.
अमेरिकेत
२ कोटी ९५ लाख
रुग्ण
2 कोटी
लोक बरे झाले.