पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वी अमेरिकेनं इस्रायलमध्ये तैनात केले 11 F-22 रॅप्टर फायटर जेट, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:37 IST2026-02-25T15:36:15+5:302026-02-25T15:37:51+5:30
अमेरिकेने हे विमान अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही, यावरून त्याचे सामरिक महत्त्व समजू शकते.

पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये पोहोचण्यापूर्वी अमेरिकेनं इस्रायलमध्ये तैनात केले 11 F-22 रॅप्टर फायटर जेट, कारण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान, अमेरिकेने एक मोठे पाऊल उचलत, इराणसोबतचा वाढता तणाव लक्षात घेता, पहिल्यांदाच आपली अत्याधुनिक F-22 रॅप्टर लढाऊ विमाने इस्रायलमध्ये तैनात केली आहेत.
नेगेव वाळवंटात ११ विमाने -
माध्यमांतील वृत्तांनुसार, अमेरिकेने इस्रायलच्या नेगेव वाळवंटातील ओवदा एअरबेसवर आपले ११ F-22 रॅप्टर विमाने उतरवली आहेत. इराणवर दबाव निर्माण करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने कोणत्याही संयुक्त सरावाशिवाय अथवा थेट मोहिमेसाठी ही विमाने इस्रायली भूमीवर उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही तैनाती संभाव्य लष्करी कारवाईच्या तयारीचा भाग असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
F-22 रॅप्टरची ताकद
F-22 रॅप्टर हे पाचव्या पिढीतील 'स्टेल्थ' फायटर जेट आहे. हे विमान जगातील सर्वात घातक लढाऊ विमान मानले जाते. प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान, सुपरक्रूझ क्षमता आणि अचूक मारा करणारी शस्त्रप्रणाली ही याची वैशिष्ट्ये आहेत. अमेरिकेने हे विमान अद्याप कोणत्याही देशाला विकलेले नाही, यावरून त्याचे सामरिक महत्त्व समजू शकते.
पंतप्रधान मोदींचा दौरा असा -
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करतील. यानंतर, इस्रायलच्या संसदेला (नेसेट) संबोधित करतील. याशिवाय ते तेथील भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. दरम्यान, भारत आणि इस्रायलमध्ये एक मजबूत आणि बहुआयामी धोरणात्मक भागीदारी असल्याचेही यांनी म्हटेल आहे. .