निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 10:19 IST2026-01-06T10:19:03+5:302026-01-06T10:19:21+5:30
Barry Pollack defending Maduro: मादुरो यांना अमेरिकन न्यायालयाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या आणि यशस्वी वकिलांपैकी एक, बॅरी पोलॅक मैदानात उतरले आहेत.

निकोलस मादुरो केसालाही धक्का न लागता सुटणार? हरलेली केस जिंकणारा वकील उभा ठाकला; जूलियन असांजला वाचविलेले...
अमेरिकन लष्कराने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता कायदेशीर लढाईला वेग आला आहे. मादुरो यांना अमेरिकन न्यायालयाच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी जगातील सर्वात महागड्या आणि यशस्वी वकिलांपैकी एक, बॅरी पोलॅक मैदानात उतरले आहेत. पोलॅक हे तेच वकील आहेत ज्यांनी विकिलीक्सचे संस्थापक जूलियन असांज यांना अमेरिकेच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले होते.
बॅरी पोलॅक हे वॉशिंग्टन डीसी मधील एक दिग्गज वकील आहेत. गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय आणि फौजदारी खटल्यांमध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो. पोलॅक यांनी केवळ जूलियन असांजच नाही, तर अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. आता निकोलस मादुरो यांच्यावर लावण्यात आलेले 'नार्को-टेररिझम' आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप खोडून काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
जूलियन असांज केसचा चमत्कार पुन्हा घडणार?
जूलियन असांज यांच्यावर अमेरिकेची गुप्त माहिती फोडल्याचा आरोप होता आणि त्यांना जन्मठेपेची भीती होती. मात्र, बॅरी पोलॅक यांच्या कायदेशीर डावपेचांमुळे असांज यांचा तुरुंगवास टळला आणि ते मायदेशी परतले. मादुरो यांचे समर्थक आता पोलॅक यांच्याकडून अशाच चमत्काराची अपेक्षा करत आहेत.
अमेरिकन सरकारसमोर मोठे आव्हान
मादुरो यांच्या अटकेमुळे आधीच रशिया आणि चीन संतप्त असताना, बॅरी पोलॅक यांच्यासारखा तज्ज्ञ वकील मादुरो यांची बाजू मांडणार असल्याने अमेरिकेच्या न्याय विभागाची (DOJ) डोकेदुखी वाढली आहे. ही केस केवळ गुन्हेगारी खटला नसून, आता ती एक मोठी जागतिक कायदेशीर लढाई बनली आहे.