बराक ओबामा, क्लिंटन यांच्या टपालात स्फोटके?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 06:13 AM2018-10-25T06:13:50+5:302018-10-25T06:14:26+5:30

गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे पाठविलेल्या टपालातून ‘संभाव्य स्फोटके’ असलेली दोन पाकिटे गुप्तचर संस्थेने हुडकून काढली आहेत.

Barack Obama, Clinton's office explosives? | बराक ओबामा, क्लिंटन यांच्या टपालात स्फोटके?

बराक ओबामा, क्लिंटन यांच्या टपालात स्फोटके?

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या नावे पाठविलेल्या टपालातून ‘संभाव्य स्फोटके’ असलेली दोन पाकिटे गुप्तचर संस्थेने हुडकून काढली आहेत.
ओबामा यांना बुधवारी तर क्लिंटन यांना हे टपाल मंगळवारी आले होते. या दोन्ही नेत्यांना गुप्तचर संस्थेचे संरक्षण उपलब्ध असून त्यांच्या टपालाचा प्रत्यक्ष बटवडा करण्यापूर्वी नियमितपणे स्कॅनिंग केले जाते. तशाच स्कॅनिंगमध्ये ही संशयास्पद पाकिटे मिळाल्याने साहजिकच ती या दोघांपर्यंत पोहोचून होणारा संभाव्य धोका टळला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पाहिली जाणारी अमेरिकी काँग्रेसची मध्यावधी निवडणूक येत्या ६ नोव्हेंबरला व्हायची आहे. त्याचा या संभाव्य स्फोटक टपालाशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे. 

Web Title: Barack Obama, Clinton's office explosives?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.