VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 20:03 IST2025-12-28T19:57:00+5:302025-12-28T20:03:30+5:30

Bangladesh Violence: बांगलादेशाच हिंदूंची टार्गेट किलिंग सुरूच आहे.

Bangladesh Violence: VIDEO: Another Hindu murdered in Bangladesh; Locked in house and burnt, claims Amit Malviya | VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...

VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...

Bangladesh Violence: बांग्लादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या निर्घृण हत्येनंतर आता पिरोजपूर जिल्ह्यातील पलाश कांती साहा यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केली आहे.

घरात कोंडून आग लावल्याचा आरोप

अमित मालवीय यांच्या म्हणण्यानुसार, 27 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6 वाजता पिरोजपूर जिल्ह्यातील दुमुरिया गावात इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पलाश कांती साहा यांना त्यांच्या घरात कोंडून घराला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात घर जळताना आणि बाहेर उभे असलेले लोक रडताना दिसत आहेत. 

एक दिवस आधीही घरे जाळल्याचा दावा

मालवीय यांनी पुढे सांगितले की, याच जिल्ह्यातील पिरोजपूर सदर भागातील पश्चिम दुमुरीतला गावात या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी दोन हिंदू कुटुंबांची पाच घरे जाळण्यात आली होती. या घटना बांग्लादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचे दर्शवतात, असा आरोप त्यांनी केला.

मालदा-मुर्शिदाबाद हिंसाचाराची आठवण

आपल्या पोस्टमध्ये अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमधील मालदा आणि मुर्शिदाबाद येथील सांप्रदायिक दंग्यांचा उल्लेख करत तुलना केली. ते म्हणाले की, त्या काळात हिंदूंची घरे निवडकपणे लक्ष्य करण्यात आली होती आणि हरगोबिंद दास व चंदन दास या पिता-पुत्राला मारहाण करून ठार मारण्यात आले होते.

ममता बनर्जींच्या भूमिकेवर टीका

मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री ममता बनर्जी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. हिंदूंच्या संरक्षणासाठी काहीच करण्यात आले नाही. आजही त्यांची चुप्पी आणि निष्क्रियता सीमेपलीकडील कट्टरपंथीयांना अधिक धाडसी बनवत आहे, असा आरोप त्यांनी केला. फक्त धर्माच्या आधारे हिंदूंना लक्ष्य केले जात असताना जग डोळेझाक करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title : बांग्लादेश में एक और हिंदू की हत्या; घर में आग: मालवीय का दावा।

Web Summary : बांग्लादेश में एक और हिंदू, पलाश कांति साहा की कथित तौर पर हत्या कर दी गई। उनके घर में आग लगा दी गई। बीजेपी नेता अमित मालवीय ने अल्पसंख्यकों के खिलाफ बढ़ती हिंसा पर चिंता जताई और ममता बनर्जी की चुप्पी की आलोचना की।

Web Title : Hindu man killed in Bangladesh; house set ablaze: Malviya claims.

Web Summary : Another Hindu, Palash Kanti Saha, was allegedly murdered in Bangladesh. His house was set on fire. BJP leader Amit Malviya raised concerns about increasing violence against minorities and criticized Mamata Banerjee's silence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.