रवींद्रनाथ टागोरांच्या सिराजगंज जिल्ह्यातील घराची तोडफोड; बांग्लादेशातील दंगलखोरांचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:24 IST2025-06-12T12:22:45+5:302025-06-12T12:24:06+5:30
Bangladesh: बांग्लादेशात कट्टरतावाद्यांचे वर्चस्व सतत वाढत आहे.

रवींद्रनाथ टागोरांच्या सिराजगंज जिल्ह्यातील घराची तोडफोड; बांग्लादेशातील दंगलखोरांचे कृत्य
Bangladesh: बांग्लादेशात कट्टरतावाद्यांचे वर्चस्व सतत वाढत आहे. बांग्लादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्यानंतर आता नोबेल पारितोषिक विजेते आणि भारतासह बांग्लादेशाचे राष्ट्रगीत लिहीणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घराची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. जमावाने सिराजगंज जिल्ह्यातील कचरीबारी येथील ऐतिहासिक टागोर निवासस्थानाची तोडफोड करण्यासोबतच, संग्रहालयाच्या सभागृहाचे नुकसान केले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८ जून रोजी एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह रवींद्रनाथ टागोर संग्रहालयाला भेट देण्यासाठी आला होता. पार्किंग शुल्कावरून त्या व्यक्तीचा तिथे काम करणाऱ्या लोकांशी वाद झाला. त्या व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी या वास्तुची तोडफोड केली. विशेष म्हणजे, रवींद्रनाथ टागोर यांनी याच घरात बसून अनेक जगप्रसिद्ध कविता लिहिल्या आहेत.
🔸 Rabindranath Tagore’s ancestral house was vandalised in Sirajganj district of Bangladesh.
— Joy Das 🇧🇩 (@joydas1844417) June 11, 2025
That's how the Greatest poet of Bengal is respected by Bengali muslims. pic.twitter.com/uOa3UtVEgw
टागोर यांनीच बांग्लादेशचे राष्ट्रगीत 'अमर सोनार बांगला' लिहिले होते. पण, शेजारील देशातील कट्टरतावाद्यांनी त्यांचा आदर केला नाही. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या घटनेनंतर हे संग्रहालय काही काळासाठी बंद करण्यात आले आहे.