शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:10 IST2025-05-20T11:09:25+5:302025-05-20T11:10:20+5:30

Sheikh Hasina, Bangladesh Government: बांगलादेशचे हंगामी सरकार शेख हसीना यांच्यासाठी एकामागून एक अडचणी वाढवण्याचे प्रयत्न करत आहे.

Bangladesh Muhammad Yunus government new move against Sheikh Hasina earlier political was banned now two cases registered | शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...

शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...

Sheikh Hasina, Bangladesh Government: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. बांगलादेशचे हंगामी सरकार शेख हसीना यांच्यासाठी एकामागून एक अडचणी वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. याआधी हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या पक्षावर अधिकृतपणे बंदी घातल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच, या निर्णयामुळे त्यांना निवडणूक लढवण्यापासूनही दूर ठेवण्यात येत आहे. त्यातच आता हे सरकार त्यांच्यावरील अडचणी वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. शेख हसीना यांच्यावर आता देशात दोन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला खटला कशासंदर्भात?

शेख हसीना यांच्याविरुद्ध दाखल झालेले खटले त्या काळातील आहेत, जेव्हा देशात विद्यार्थी चळवळ सुरू झाली आणि हिंसक झाली. यादरम्यान एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती आणि आता त्याच व्यक्तीच्या आईने शेख हसीना आणि अवामी लीगच्या इतर नेत्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. गेल्या वर्षी २० जुलैला नारायणगंजच्या शिमराईल भागात विद्यार्थ्यांच्या निषेधादरम्यान सजल मियां (२०) या बूट कारखान्यातील कामगाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

कुणा-कुणावर गुन्हा दाखल

या संदर्भात, शेख हसीना यांच्यासह ६१ अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान कमाल, एएलचे सरचिटणीस ओबेदुल कादर, नारायणगंज शहर महानगरपालिकेच्या माजी महापौर सेलिना हयात आयवी, माजी आमदार शमीम उस्मान आणि नजरुल इस्लाम बाबू, शमीमचा मुलगा इम्तिनन उस्मान अयोन आणि पुतण्या अजमेरी उस्मान यांचा समावेश आहे. रात्री उशिरा नारायणगंजच्या सिद्धिरगंज पोलिस ठाण्यात पीडित सेजलची आई रुना बेगम यांनी हा गुन्हा दाखल केला असल्याचे प्रभारी अधिकारी शाहिनूर आलम यांनी सांगितले. तक्रारदाराने असा दावा केला आहे की हा हल्ला अवामी लीगच्या निर्देशानुसार करण्यात आला होता आणि शेख हसीना आणि इतर वरिष्ठ नेते यात सामील असल्याचा दावाही केला आहे.

दुसरा खटला कशाशी संबंधित?

या प्रकरणासोबतच शेख हसीना यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुयापूरचे कमरुल हसन यांनी टांगाईल न्यायिक दंडाधिकारी रुमेलिया सिराजम यांच्या न्यायालयात हसीना आणि इतर १९३ जणांवर २०२४ मध्ये 'डमी निवडणुका' आयोजित केल्याचा आणि मतदानात घोळ केल्याचा आरोप करत खटला दाखल केला. १९३ आरोपींमध्ये माजी मंत्री मुहम्मद अब्दुल रज्जाक, माजी आमदार सोटो मोनीर, माजी सीईसी काझी हबीबुल अवल, माजी आयजीपी चौधरी अब्दुल्ला अल-मामून आणि टांगेलचे माजी उपायुक्त मोहम्मद शाहिदुल इस्लाम यांचा समावेश आहे.

Web Title: Bangladesh Muhammad Yunus government new move against Sheikh Hasina earlier political was banned now two cases registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.