हात-पाय बांधलेले, शरीरावर जखमा..., बांगलादेशमध्ये मतदानापूर्वीच एका हिंदूची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 09:10 IST2026-02-12T08:53:32+5:302026-02-12T09:10:30+5:30

Hindu Man Killed In Bangladesh Before Voting: दीड वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बांगलादेशमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दरम्यान, मतदानापूर्वीच बांगलादेशमध्ये एका अल्पसंख्याक हिंदू तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Bangladesh Election: Hindu man killed in Bangladesh before voting, hands and feet tied, body with injuries | हात-पाय बांधलेले, शरीरावर जखमा..., बांगलादेशमध्ये मतदानापूर्वीच एका हिंदूची हत्या

हात-पाय बांधलेले, शरीरावर जखमा..., बांगलादेशमध्ये मतदानापूर्वीच एका हिंदूची हत्या

दीड वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर बांगलादेशमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दरम्यान, मतदानापूर्वीच बांगलादेशमध्ये एका अल्पसंख्याक हिंदू तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मौलवी बाजार परिसरात रतन साहुकार नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार २८ वर्षीय रतन साहुकार याचा मृतदेह बुधवारी सकाळी १० वाजता चम्पारा परिसरातील चहाच्या बागेमध्ये सापडला. या मृतदेहाचे हात पाय बांधलेले होते. तसेच त्याच्या शरीरावर धारदार वस्तूने वार केल्याच्या खुणा होत्या. तसेच त्यामधून सातत्याने रक्त वाहत होते. दरम्यान, रतन याची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेचा या हत्येमागे निवडणुकीतील वाद आहे की वैयक्तिक वादातून ही हत्या झाली आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. मात्र बांगलादेशमध्ये होत असलेल्या निवडणुकीपूर्वी एक दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे देशातील अल्पसंख्याक हिंदू समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

Web Title : बांग्लादेश में चुनाव से पहले हिंदू व्यक्ति की हत्या; हाथ-पैर बंधे मिले

Web Summary : बांग्लादेश में चुनाव से पहले मौलवीबाजार में रतन साहूकार नामक एक हिंदू व्यक्ति की बेरहमी से हत्या कर दी गई। उसका शव बंधे हुए अंगों और चाकू के घावों के साथ मिला। सहयोगियों ने जानबूझकर हत्या का आरोप लगाया है। पुलिस जांच कर रही है कि मकसद चुनाव संबंधी था या व्यक्तिगत, जिससे हिंदू अल्पसंख्यक में डर पैदा हो गया है।

Web Title : Hindu Man Murdered in Bangladesh Before Elections; Hands, Feet Tied

Web Summary : Ahead of Bangladesh's elections, a Hindu man, Ratan Sahukar, was brutally murdered in Moulvibazar. His body was found with tied limbs and stab wounds. Colleagues allege a deliberate killing. Police are investigating whether the motive was election-related or personal, sparking fear among the Hindu minority.